काटोलच्या सिट्रस इस्टेटला 'बूस्ट', मिळाला 'इतक्या' कोटींचा निधी
By जितेंद्र ढवळे | Updated: April 18, 2023 16:56 IST2023-04-18T16:55:42+5:302023-04-18T16:56:34+5:30
शेतकऱ्यांना मागर्दशन करण्यासाठी तंज्ञ मंडळीचे मार्गदशन शिबिरसुद्धा लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती

काटोलच्या सिट्रस इस्टेटला 'बूस्ट', मिळाला 'इतक्या' कोटींचा निधी
नागपूर : काटोल तालुक्यातील ढिवरवाडी येथील सिट्रस इस्टेटला राज्य सरकारने बूस्ट दिला आहे. १२ कोटीच्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे संत्रा वर्गीय रोपे मिळावे हा यामागचा उदेश आहे. येथील विकास कामासाठी यापूर्वी १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आलला होता. आता परत २ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
संत्रा व मोसंबी उत्पादकांना चांगल्या दर्जाची संत्रा वर्गीय रोपे मिळावी. शिवाय नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे. माफक दरात संत्रा व मोसंबी उत्पादनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन देणे. तसेच संत्रा व मोसंबीला विदेशात निर्यात करण्याच्या दुष्टीकोणातून प्रयत्न करण्यासाठी सिट्रस इस्टेटची स्थापना करण्यात आली आहे.
ढिवरवाढी येथे जवळपास ३४ एकर असलेल्या या जागेत सुरुवातीला १० एकर जागा ही सिट्रस इस्टेटला देण्यात आली होती. विकास आराखडा तयार केल्यानंतर परत जागेची आवश्यकता असल्याने ४ एकर जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी मागणीसुद्धा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मागर्दशन करण्यासाठी तंज्ञ मंडळीचे मार्गदशन शिबिरसुद्धा लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती जि. प. सदस्य सलील देशमुख यांनी दिली.
१२ कोटी रुपये या प्रकल्पाची किंमत असून आतापर्यत ३ कोटी ३८ लाख मिळाले आहे. या अगदोर मिळालेल्या १ कोटी ५ लाख रुपयातून संत्रा व मोसंबी बागांच्या मशागतीसाठी जे यंत्र लागतात त्यांची खरेदी करण्यात आली. ते उत्पादकांना माफक दरात किरायाणे देण्यात येते असून मोठया प्रमाणात शेतकरी याचा वापर करीत आहे.
याचा फायदासुद्धा संत्रा व आता नव्याने जे २ कोटी ४३ लाख देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने प्रशासकीय इमारत बांधकाम, रोपवाटीकेचा विकास, औजार बँक ची निर्मीती करण्यासोबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ३ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
मध्य भारतातील पहिली प्रयोगशाळा डिसेंबरपर्यंत
पानाची तपासणी करुन झाडावर कोणता रोग आहे किंवा कोणत्या अन्नद्रव्याची कमी आहे याचा तपास करण्यासाठीची प्रयोगशाळा या सिट्रस इस्टेट मध्ये निर्माण होणार आहे. अशा प्रकारची मध्य भारतातील ही पहिलीच प्रयोगशाळा असेल. ती डिसेंबर पासून सुरू होणार आहे. याच प्रयोगशाळेतच पाणी व माती परीक्षण सुद्धा होणार आहे.