व्हॉटसअ‍ॅपद्वारे वेश्याव्यवसाय

By Admin | Updated: June 20, 2015 23:24 IST2015-06-20T23:24:10+5:302015-06-20T23:24:10+5:30

व्हॉटस् अ‍ॅपवर मुलींचे फ ोटो पाठवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास लावणाऱ्या दोन महिलांना अटक करून बळी पडलेल्या तिघींची सुटका करण्यात

VoicesApps prostitution | व्हॉटसअ‍ॅपद्वारे वेश्याव्यवसाय

व्हॉटसअ‍ॅपद्वारे वेश्याव्यवसाय

ठाणे : व्हॉटस् अ‍ॅपवर मुलींचे फ ोटो पाठवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास लावणाऱ्या दोन महिलांना अटक करून बळी पडलेल्या तिघींची सुटका करण्यात ठाणे पोलिसांना यश आले. भाड्याच्या घरात हा व्यवसाय सुरु करून प्रती ग्राहकामागे कल्पना अहिरराव ही पाचशे रुपये घेत असल्याचे समोर आल्याचे वपोनि शकील शेख यांनी सांगितले.
लोकमान्यनगर परिसरात काही महिलांना पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने डमी ग्राहक पाठवून लोकमान्यनगर पाडा नं.२ येथील मंगलमूर्ती अपार्टमेंटवर छापा टाकला. यावेळी प्रिती आवारी आणि कल्पना अहिरराव या दोघींना अटक क रून त्यांच्या तावडीतू तिघींची सुटका केली. कल्पनाने ते घर भाड्याने घेतले होते. तर प्रिती व्हॉट्स अ‍ॅपवर ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून व्यवहार करून वेश्याव्यवसाय चालवित असे.

Web Title: VoicesApps prostitution