अंबरनाथमध्ये तीन कंपन्यांना आग

By Admin | Updated: October 14, 2014 02:11 IST2014-10-14T02:11:27+5:302014-10-14T02:11:27+5:30

अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या पॅसिफिक ऑर्गेनिक कंपनीला रात्री 9च्या सुमारास भीषण आग लागली.

Three companies of Ambernath fire | अंबरनाथमध्ये तीन कंपन्यांना आग

अंबरनाथमध्ये तीन कंपन्यांना आग

च्अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या पॅसिफिक ऑर्गेनिक कंपनीला रात्री 9च्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीतील केमिकलचे ड्रम शेजारच्या कंपन्यांवर पडल्याने शेजारी असलेल्या पोनिट्राक आणि मेलॉक कंपनीलाही आग लागली. ज्या कंपनीत आग लागली तिथे बरेच कामगार अडकले असण्याची शक्यता अग्निशमन विभागाने वर्तविली आहे. 
 
च्पॅसिफिक कंपनीत असलेल्या ड्रमचे मोठे स्फोट होत असल्याने आग विझविताना अग्निशमन विभागाला मोठी कसरत करावी लागली. ही आग विझविण्यासाठी अंबरनाथ एमआयडीसी, अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद, उल्हासनगर आणि कल्याण महानगरपालिकेचे बंब बोलविण्यात आले होते.

 

Web Title: Three companies of Ambernath fire