मुंबईतील तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी

By Admin | Updated: August 27, 2015 03:09 IST2015-08-27T03:09:57+5:302015-08-27T03:09:57+5:30

मुंबईत आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. अवघ्या २३ दिवसांत मुंबईत तिसरी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवार

The third surgery in Mumbai has been successful | मुंबईतील तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबईतील तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : मुंबईत आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. अवघ्या २३ दिवसांत मुंबईत तिसरी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवार, २६ आॅगस्टला झाली. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून ४९ वर्षीय रुग्णाचा जीव करून वाचवण्यात यश आले आहे.
मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात ४९ वर्षीय रुग्ण अक्युट कार्डिओमायोपॅथीने आजारी असल्यामुळे दाखल झाला होता. या रुग्णाची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर उपचार म्हणजे हृदय प्रत्यारोपण हाच होता. एक ६२ वर्षीय रुग्ण रुग्णालयात दाखल होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर त्याच्या नातेवाइकाने अवयवदानासाठी परवानगी दिली. यावेळी त्या रुग्णाचे हृदयदान करण्याचाही निर्णय नातेवाइकांनी घेतला. फोर्टिस रुग्णालयातच दाखल असलेल्या ४९ वर्षीय रुग्णाला हृदयाची गरज होती.
ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यावर सकाळी ९ वाजून ४१मिनीटांनी ६२ वर्षीय रुग्णाचे हृदय काढण्यात आले. ९ वाजून ४६ मिनिटांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. २ तास ४९ मिनिटे वेळात हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. ब्रेनडेड रुग्णाच्या नातेवाइकांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. अवयवदानात हृदयदानही करता येते याची जनजागृती होत असल्याचे हे एक उदाहरण आहे. कुटुंबीयांचा मी आभारी आहे. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. पुढचे ४८ ते ७२ तास रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे कार्डिएक सर्जन डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले.

एका वृद्धाने दिले चौघांना जीवनदान
बुधवारी ६२ वर्षीय रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे चौघा जणांना जीवनदान मिळाले आहे. हृदयाच्या बरोबरीनेच दोन किडन्या आणि यकृत दान करण्यात आले. एक किडनी आणि यकृत फोर्टिस रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले असून, किडनी लीलावती रुग्णालयातील एका रुग्णाला देण्यात आली आहे.

Web Title: The third surgery in Mumbai has been successful