'....तर निधी देताना विचार केला जाईल'; अमित साटम यांचा मुंबईतील नगरसेवकांना सज्जड दम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:48 IST2026-05-02T15:35:15+5:302026-05-02T15:48:34+5:30
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईतील भाजपा नगरसेवकांना इशारा दिला आहे.

'....तर निधी देताना विचार केला जाईल'; अमित साटम यांचा मुंबईतील नगरसेवकांना सज्जड दम
मुंबईतीलभाजपा नगरसेवकांना पक्षशिस्त पाळणार नसाल तर निधी देताना विचार केला जाईल, असा इशारा मुंबईभाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिला आहे. महत्त्वाच्या प्रस्तावावेळी नगरसेवकांनी अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब आहे. यापुढे सभागृहाच्या कामकाजात कुठलाही हलगर्जीपणा सहन केली जाणार नसल्याचे अमित साटम यांनी म्हटले आहे.
मित साटम यांनी भाजपा नगरसेवकांची कानउघडणी केली. मुंबईकरांनी आपल्याला अपेक्षेने निवडून दिले आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडू नका, असेही साटम यांनी नगरसेवकांना सांगितले. साटम यांनी सर्व नगरसेवकांची एक ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी महापौर रितू तावडे यांनी नगरसेवक उपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला.
रितू तावडे म्हणाल्या, नगरसेवकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. पक्षाने नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. व्हीप बजावला असता का आले नाहीत? याबद्दल विचारणा केली आहे. दरम्यान, आता अमित साटम यांनी नगरसेवकांना सुनावले आहे.