तलासरी पोलिसांनी २२ हजाराची दारू पकडली

By Admin | Updated: June 23, 2015 00:58 IST2015-06-23T00:58:24+5:302015-06-23T00:58:24+5:30

मुंबईमध्ये विषारी दारूचे बळी पडल्याची घटना घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ग्रामीण भागातही धडक कारवाईस सुरुवात केली आहे.

Thalassari police caught 22,000 liquor | तलासरी पोलिसांनी २२ हजाराची दारू पकडली

तलासरी पोलिसांनी २२ हजाराची दारू पकडली

तलासरी : मुंबईमध्ये विषारी दारूचे बळी पडल्याची घटना घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ग्रामीण भागातही धडक कारवाईस सुरुवात केली आहे.
तलासरी पोलीसांनी प्रभारी पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ठिकाणी धाडी टाकून २२ हजाराची अवैध दारू पकडून तीन आरोपींना गजाआड केले.
तलासरीजवळ असलेल्या दमण व दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून मोठ्या प्रमाणात दमण बनावटीची चोरटी दारू महाराष्ट्रात आयात होते. याची माहिती असूनही शासनाचे अबकारी खाते या भागात सुस्तावलेले दिसते. तलासरी पोलीसांनी रविवारी तलासरी -बारातपाडा येथे एका गाडीतील ९३६० रू. ची चोरटी दारू पकडून राजेश माटू भोये यास अटक केली.
दुसऱ्या घटनेत राजू चौधरी हा रिक्षातुन दारू घेऊन जात असताना दापचरी ठाकरपाडा येथे त्याला अडवून ७०८० रू. ची दारू जप्त करून त्याला अटक केली.
तसेच कवाडा ठाकरपाडा येथे घरात लपवून ठेवलेली ५६१५ रू. ची दारू पकडून मनोज ठाकरे यास अटक केली. (वार्ताहर)

Web Title: Thalassari police caught 22,000 liquor