यालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 08:42 IST2021-05-18T08:41:46+5:302021-05-18T08:42:19+5:30

आमच्‍या टीमची अचुकता व वैद्यकीय कौशल्‍याच्‍या मदतीने आम्‍ही तिची प्रसुती करण्‍यात यशस्‍वी झालो. तिने एक मुलगा व मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्‍म दिला.

The test was given from the bed after giving birth to twins | यालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा 

यालाच म्हणतात जिद्द अन् चिकाटी; जुळ्यांना जन्म दिल्यावर बेडवरूनच दिली परीक्षा 

मुंबई : जिद्द आणि चिकाटी असेल तर कठिणातले कठीण ध्येय साध्य करता येते, हे मुंबईकर ३० वर्षीय महिलेने दाखवून दिले आहे. तिने उच्च रक्तदाब आणि कावीळवर मात करत जुळ्या मुलांना जन्म दिला. इतकेच नव्हे तर मुलांना जन्म दिल्यानंतर २४ तासांनी बेडवरूनच बी. एड्.ची परीक्षा दिली. दिव्‍या शर्मा असे या महिलेचे नाव आहे.

मुलुंड येथील एका खासगी हॉस्पिटलमधील कन्‍सल्‍टन्ट-ऑब्स्‍टेट्रिशियन व ग्‍यानेकोलॉजिस्‍ट डॉ. अतुल गणत्रा यांनी सांगितले की, ही महिला ३६.६ आठवड्यांची गरोदर होती आणि तिच्‍या गर्भामध्‍ये जुळी मुले होती. तिला रुग्णालयामध्‍ये दाखल करण्यात आले, तेव्‍हा उच्‍च रक्‍तदाब हाेता आणि तिच्‍या रक्‍तामधील प्‍लेटलेट्स खूपच कमी झाल्‍या होत्‍या. तिला कोलेस्‍टेसिस असल्‍याचे निदान झाले. आम्‍ही त्‍वरित तिला स्थिर केले आणि शस्त्रक्रियेसाठी नेले. तिच्‍या स्थितीमुळे सी-सेक्‍शन अत्‍यंत धोकादायक बनले. आमच्‍या टीमची अचुकता व वैद्यकीय कौशल्‍याच्‍या मदतीने आम्‍ही तिची प्रसुती करण्‍यात यशस्‍वी झालो. तिने एक मुलगा व मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्‍म दिला.

शस्‍त्रक्रियेच्‍या काही तासांनंतर आम्‍हाला समजले की, तिची बी. एड्.ची अंतिम परीक्षा आहे आणि तिची परीक्षा देण्‍याची इच्‍छा आहे. तिची स्थिती पाहता आम्‍हाला वाटले की, तिला परीक्षा देणे अवघड जाईल. पण तिने आम्‍हाला मदत करण्‍याची विनवणी केली. आम्‍ही तिचा निर्धार खचू दिला नाही आणि आयसीयू बेडवरून तिला परीक्षा देता येईल, अशी व्‍यवस्था करण्‍याचे ठरवले. दरम्यान, उपचारांमुळे तिच्या स्थितीमध्‍ये सुधारणा झाली आणि आम्‍ही तिला वॉर्डमध्‍ये हलवले, जेथे ती सुलभपणे परीक्षा देऊ शकली.

Web Title: The test was given from the bed after giving birth to twins