तेजस ठाकरे यांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, उपचार सुरू, प्रकृतीबाबत मिळाली अशी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:25 IST2026-02-15T12:24:50+5:302026-02-15T12:25:46+5:30

Tejas Thackeray News: उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ पुत्र तेजस ठाकरे यांची तब्येत अचाकन बिघडली असून, त्यांना तातडीने रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस ठाकरे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tejas Thackeray's health deteriorated, he was immediately admitted to the hospital, treatment is underway, an update was received regarding his health. | तेजस ठाकरे यांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, उपचार सुरू, प्रकृतीबाबत मिळाली अशी अपडेट

तेजस ठाकरे यांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, उपचार सुरू, प्रकृतीबाबत मिळाली अशी अपडेट

उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ पुत्र तेजस ठाकरे यांची तब्येत अचाकन बिघडली असून, त्यांना तातडीने रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस ठाकरे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी तेजस ठाकरे यांच्यासोबत आई रश्मी ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे हे रुग्णालयात आले होते.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर विविध प्राथमिक चाचण्या करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून तेजस ठाकरे यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे तेजस ठाकरे यांच्या प्रकृतीची सातत्याने विचारपूस करत असून, त्यांच्यावरील उपचारांबाबत डॉक्टरांसोबतही नियमितपणे चर्चा करत आहेत. सद्यस्थिती तेजस ठाकरे यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून, त्यांना लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.  

Web Title: Tejas Thackeray's health deteriorated, he was immediately admitted to the hospital, treatment is underway, an update was received regarding his health.