वसईतील बळीराजा झाला टेक्नोसॅव्ही

By Admin | Updated: June 21, 2015 22:47 IST2015-06-21T22:47:31+5:302015-06-21T22:47:31+5:30

वसई परिसरात वरुणराजा समाधानकारक बरसल्याने बळीराजा सध्या काळ्या आईची सेवा पारंपारिक पद्धतीने नव्हे तर प्रगत यंत्र-तंत्र वापरून

TechnoSavi in ​​Vasai | वसईतील बळीराजा झाला टेक्नोसॅव्ही

वसईतील बळीराजा झाला टेक्नोसॅव्ही

पारोळ : वसई परिसरात वरुणराजा समाधानकारक बरसल्याने बळीराजा सध्या काळ्या आईची सेवा पारंपारिक पद्धतीने नव्हे तर प्रगत यंत्र-तंत्र वापरून करू लागला आहे. तालुक्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्यात पूर्ण झाल्या असून सुकी पेरणी, राबपेरणी, धूळपेरणी, भात भिजवून पेरण्या यामध्ये अशा पद्धतीच्या पेरण्यांचा समावेश आहे.
पेरणी करण्यासाठी या काळामध्ये बळीराज्याकडे बैलजोडी व घरचे बियाणे नसल्यामुळे त्याला आता संकरित बियाणे व उखळणीसाठी ट्रॅक्टर पॉवर टेलर या यांत्रिक अवजाराचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. यावर्षीचा विचार केला असता संकरीत बियाण्यांचे भाव स्थीर असले तरी मजुरी, खते महाग झाल्यामुळे बळीराज्याला शेती करणे न परवडणारे झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: TechnoSavi in ​​Vasai