१५ संस्थांना पालिकेची नोटीस

By Admin | Updated: February 24, 2016 01:56 IST2016-02-24T01:56:11+5:302016-02-24T01:56:11+5:30

मैदान व उद्यानांसाठी पालिकेने आणलेल्या नवीन धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर आत्तापर्यंत काळजीवाहू तत्त्वावर दिलेले सर्वच भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे़

Subject Notice to 15 organizations | १५ संस्थांना पालिकेची नोटीस

१५ संस्थांना पालिकेची नोटीस

मुंबई : मैदान व उद्यानांसाठी पालिकेने आणलेल्या नवीन धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर आत्तापर्यंत काळजीवाहू तत्त्वावर दिलेले सर्वच भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे़ त्यानुसार, खेळाचे व मनोरंजन मैदानाची देखभाल करणाऱ्या ६० संस्थांना नोटीस दिल्यानंतर पालिकेने आता आणखी १५ भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़
मैदाने व उद्याने काळजीवाहू तत्त्वावर देण्याचे धोरण रद्द ठरवून पालिकेने नवीन धोरण आणले़ त्यानुसार, दत्तक तत्त्वावर मैदाने खासगी संस्थांकडे देखभालीसाठी देण्यात येणार होती़
मात्र, पालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देत, २१६ भूखंड परत घेण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Subject Notice to 15 organizations