Strict action will be taken against cyber criminals, orders of Home Minister anil deshmukh MMG | सायबर गुन्ह्यासंदर्भात होणार कडक कारवाई, गृहमंत्र्यांचे आदेश

सायबर गुन्ह्यासंदर्भात होणार कडक कारवाई, गृहमंत्र्यांचे आदेश

मुंबई -लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबरने  कडक कारवाई करावी असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४०९ गुन्हे दाखल झाले. तसेच २१४ व्यक्तींना अटक केली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर  समन्वय साधून काम करीत  असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. 

महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक, फेसबुक, व अन्य सोशल मीडियवर सरकार लक्ष ठेवून आहे. लॉकडाउनमध्ये  विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४०९ गुन्ह्यांची नोंद २२ मे पर्यंत झाली आहे. यामध्ये आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७२ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok विडिओ शेअर प्रकरणी १९ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा  आतापर्यंत २१८ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Strict action will be taken against cyber criminals, orders of Home Minister anil deshmukh MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.