‘बेस्ट’ बसमध्ये चोरी : महिलेला अटक

By Admin | Updated: March 18, 2016 01:29 IST2016-03-18T01:29:36+5:302016-03-18T01:29:36+5:30

मालवणी येथे बेस्ट बसमध्ये एका महिला प्रवाशाची पर्स पळविणाऱ्या आरोपी महिलेला मालवणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. गेल्या आठवड्यात मंगळवारी ममता नामक एका

Stolen in 'Best' bus: woman arrested | ‘बेस्ट’ बसमध्ये चोरी : महिलेला अटक

‘बेस्ट’ बसमध्ये चोरी : महिलेला अटक

मुंबई : मालवणी येथे बेस्ट बसमध्ये एका महिला प्रवाशाची पर्स पळविणाऱ्या आरोपी महिलेला मालवणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. गेल्या आठवड्यात मंगळवारी ममता नामक एका महिलेची पर्स पळविण्यात आली होती. ममता या मालवणीत रुट क्रमांक दोनशे सातने प्रवास करत असताना मालवणीच्या गेट क्रमांक सहाजवळ हा प्रकार घडला. तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी लक्ष्मीकुमार बोयी (३५) या महिलेला अटक केली. ही महिला मालाड रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहते.
चोरीला गेलेल्या पर्समध्ये ममता यांचे मंगळसूत्र, अंगठी आणि काही रोख रक्कम होती. बोयीने पर्समधील दागिने लगेचच विकले. त्यातून तिला मिळालेल्या रकमेतील अवघे साडेतीन हजार रुपये पोलिसांनी तिच्याकडून हस्तगत केले. (प्रतिनिधी)

Web Title: Stolen in 'Best' bus: woman arrested