shivsena mp sanjay raut discharged from lilavati Hospital | संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांकडून आरामाचा सल्ला

संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांकडून आरामाचा सल्ला

ठळक मुद्देसंजय राऊत यांना डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्लालीलावती रुग्णालयात झाली संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीसंजय राऊत राहत्या घरीच करणार पुढील दोन दिवस आराम

मुंबई
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. 

संजय राऊत यांना छातीत दुखत असल्याचा त्रास पुन्हा एकदा जाणवू लागल्यानं २ डिसेंबर रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार दोन स्टेन हृदयात टाकण्यात आले आहेत. प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ. मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांच्या नेतृत्त्वाखाली संजय राऊत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस संजय राऊत त्यांच्या राहत्या घरीच आराम करणार आहेत. आज सकाळी ११ च्या सुमारात संजय राऊत रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले. 

वर्षभरापूर्वी झाली होती शस्त्रक्रिया
गेल्या वर्षी संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळले होते. नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर एप्रिल २०२० मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोविडच्या प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. तिच शस्त्रक्रिया बुधवारी २ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. 
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shivsena mp sanjay raut discharged from lilavati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.