सराईत सोनसाखळी चोर गजाआड

By Admin | Updated: July 13, 2015 01:36 IST2015-07-13T01:36:59+5:302015-07-13T01:36:59+5:30

: जे.जे. हॉस्पिटल परिसरातून एका वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पलायन करणाऱ्या एका सराईत सोनसाखळी चोरट्याला

Sarath Sonskhali Chor Ghazaad | सराईत सोनसाखळी चोर गजाआड

सराईत सोनसाखळी चोर गजाआड

मुंबई : जे.जे. हॉस्पिटल परिसरातून एका वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पलायन करणाऱ्या एका सराईत सोनसाखळी चोरट्याला जे.जे.मार्ग पोलिसांनी शिताफीने अटक केली. लिटॉन अबूकासम शेख (वय३४, रा. एकतानगर झोपडपट्टी, बीपीटी कॉलनीसमोर, वाडीबंदर) असे त्याचे नाव असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे साहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले.
जे. जे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्समध्ये राहत असलेल्या मनिबेन महिडा ही ७० वर्षांची महिला नूर मशिदीच्या दिशेने जात असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याचे पुसटसे फुटेज मिळाले होते. साहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित वर्णनाचा इसम वाडीबंदराजवळील झोपडपट्टीतून ताब्यात घेतला. तपासणीत तो गर्दुल्ला असल्याचे, त्याने घरफोडीसह अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आले. (प्रतिनिधी)

Web Title: Sarath Sonskhali Chor Ghazaad