दोन वकिलांसह सात जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:06 IST2021-07-27T04:06:33+5:302021-07-27T04:06:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वकील महिलेच्या तक्रारीवरून नरेंद्र दाभोळकर खटल्यातील आरोपींच्या दोन वकिलांसह सात जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ...

Rape case against seven people, including two lawyers | दोन वकिलांसह सात जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

दोन वकिलांसह सात जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वकील महिलेच्या तक्रारीवरून नरेंद्र दाभोळकर खटल्यातील आरोपींच्या दोन वकिलांसह सात जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात बलात्कार, खंडणी, मारहाण तसेच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.

३५ वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, यातील एका आरोपीने त्यांच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितली. तर अन्य आरोपीने त्यांचे १० हजार रुपये चोरले. तर काहींनी त्यांना मारहाण केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार, शनिवारी त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. यातील दोन वकील नरेंद्र दाभोळकर खटल्यातील आरोपींचे वकील असून, उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात प्रॅक्टीस करतात. तर अन्य पाच जण त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आहेत. यात दोन महिलांचाही समावेश आहे.

Web Title: Rape case against seven people, including two lawyers