या या या...; धनंजय मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 07:38 PM2020-01-05T19:38:32+5:302020-01-05T19:52:21+5:30

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात गुप्त विकास झाला असून हा विकास कुणालाच दिसला नाही.

NCP leader Dhananjay Munde has criticized BJP's Devendra Fadnavis | या या या...; धनंजय मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

या या या...; धनंजय मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Next

महाविकास आघाडीने  दिलेल्या कर्जमाफीवर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना फसवलं असल्याचा आरोप करत आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने दोन लाखांची कर्जमाफी केली असून दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचं देखील कर्जमाफ करणार असल्याचे सांगत मंत्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले आहे. तसेच 'मी पुन्हा येईन'चे जनक असं म्हणत धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात गुप्त विकास झाला असून हा विकास कुणालाच दिसला नाही अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांना 'मी पुन्हा येईन'चे जनक असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे या.. या.. या.. असं म्हणत जर देवेंद्र फडणवीस एखाद्याच्या बोकांडी बसले तर काय होईल अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

विधानसभा निवडणुकीत 56 आमदार निवडून आलेल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले असून 54 आमदार निवडणून आलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री आणि 44 आमदार असलेल्या पक्षांचे नेते मंत्री झाले. मात्र भाजपाचे 105 आमदार निवडून आल्यानंतरही भाजपाला विरोधी पक्षात बसायला लागलं असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच भाजपाला विरोध करणाऱ्यांना सीबीआय आणि ईडीची नोटीस पाठवण्यात यायची. मात्र निवडणुकीनंतर भाजपाची मग्रुरी जनतेनं मोडून काढली व राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं अशी टीका देखील धनंजय मुंडे यांनी भाजपावर केली आहे. 

Web Title: NCP leader Dhananjay Munde has criticized BJP's Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.