मुंबई पोलिसांचे उच्च न्यायालयाकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 06:36 AM2020-10-31T06:36:52+5:302020-10-31T06:37:51+5:30

Mumbai police News: विपरीत परिस्थितीतही चाेख कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना नागरिकांनीही सहकार्य करावे. मुंबई पोलीस हे जगातील उत्तम पोलिसांपैकी एक असल्याचे मानण्यात येते, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले.

Mumbai Police praised by the High Court | मुंबई पोलिसांचे उच्च न्यायालयाकडून कौतुक

मुंबई पोलिसांचे उच्च न्यायालयाकडून कौतुक

Next

मुंबई : कोरोना, लॉकडाऊनच्या काळात पोलीस त्यांचे कर्तव्य अत्यंत दबावाखाली पार पाडत आहेत. विपरीत परिस्थितीतही चाेख कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना नागरिकांनीही सहकार्य करावे. मुंबई पोलीस हे जगातील उत्तम पोलिसांपैकी एक असल्याचे मानण्यात येते, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले. या काळात पोलिसांचे काम कठीण होते. पोलीस दबावाखाली होते. त्यानंतर मिरवणूक, मोर्चे इत्यादींसाठी बंदोबस्त करण्याचे कामही होते, असे निरीक्षण न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने नोंदविले. 

या विपरीत स्थितीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट  करणाऱ्या नवी मुंबईच्या सुनैना होले यांच्यावर दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा गुन्हा नोंदविला. ताे रद्द करण्यासाठी सुनैना न्यायालयात याचिका दाखल केली. 
गुरुवारी सरकारी वकील जयेश याग्निक यांनी न्यायालयाला  सांगितले की, सुनैनाला बीकेसी सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले आहे, तरीही ती चौकशीसाठी हजर राहत नाही. त्यावर सुनैनाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले  की, सुनैनाची तब्येत ठीक नाही. २ नोव्हेंबर रोजी ती पोलिसांपुढे चौकशीसाठी उपस्थित राहील. न्यायालयाने हे मान्य करत सुनैनाला २ नोव्हेंबर रोजी बीकेसी सायबर सेलपुढे चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. त्या वेळी वरील निरीक्षण न्यायालयाने नाेंदवले. 

जगातील उत्तम पोलिसांपैकी एक
गुरुवारी सरकारी वकील जयेश याग्निक यांनी मुंबई पोलीस चाेख काम करीत आहेत. ते जगातील उत्तम पोलिसांपैकी एक आहेत. त्यांची तुलना स्कॉटलंड  यार्ड पोलिसांशी करण्यात येते. त्यामुळे काही अंशी नागरिकांकडूनही त्यांना सहकार्य मिळणे अपेक्षित आहे, असे न्यायालयाने म्हटले.

Web Title: Mumbai Police praised by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.