मुंबईत पाच महिन्यांतील सर्वांत कमी रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:09 IST2021-07-14T04:09:14+5:302021-07-14T04:09:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाल्यानंतर दररोजची रुग्ण संख्या नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली ...

Mumbai has the lowest number of patients in five months | मुंबईत पाच महिन्यांतील सर्वांत कमी रुग्ण

मुंबईत पाच महिन्यांतील सर्वांत कमी रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाल्यानंतर दररोजची रुग्ण संख्या नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र मंगळवारी गेल्या पाच महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ४४१ बाधित आढळून आले आहेत, तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०७ टक्के एवढा आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ९२५ दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख २८ हजार ६१५ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख तीन हजार ६७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ६४४ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सहा हजार ९५० सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या आठ रुग्णांपैकी चार रुग्णांना सहव्याधी होत्या. गेल्या आठवड्यात ४५३ बाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यांनतर मंगळवारी पुन्हा रुग्णांचा आकडा कमी आहे. दिवसभरात ३० हजार १०० कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७५ लाख ९२ हजार ५०१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: Mumbai has the lowest number of patients in five months