४००हून अधिक बोगस उमेदवार

By Admin | Updated: December 8, 2015 01:26 IST2015-12-08T01:26:13+5:302015-12-08T01:26:13+5:30

पालिकेच्या अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य पर्यवेक्षकासह ५ जण सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. आरोपींच्या चौकशीत ४००हून अधिक बोगस उमेदवार सध्या पालिकेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली.

More than 400 bogus candidates | ४००हून अधिक बोगस उमेदवार

४००हून अधिक बोगस उमेदवार

मुंबई : पालिकेच्या अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य पर्यवेक्षकासह ५ जण सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. आरोपींच्या चौकशीत ४००हून अधिक बोगस उमेदवार सध्या पालिकेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली. अटक आरोपींच्या घरांच्या झडतीत या भरती प्रक्रियेत वापरण्यात येत असलेले बनावट स्टॅम्प, परवानगी पत्रांसह महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा दस्तऐवज पोलिसांनी हस्तगत
केला आहे.
मुंबई महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात येणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगारांच्या भरती घोटाळ्याप्रकरणी डी विभागाचा मुख्य पर्यवेक्षक देवजी प्रेमजी राठोडसह दलाल सनी विनोद विंजुडा, कुणाल नागजी जोगदिया, लिपिक दिलीप चौकेकर, शिपाई अनिल कांजी बारिया हे अटकेत आहेत. अटकेतील आरोपींपैकी सनी हा दलाल नसून, पालिकेच्या डी विभागातील सफाई कामगार असल्याची माहिती तपासात उघड झाली. पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्या गेल्या ५ वर्षांतील उमेदवारांच्या माहितीचा शोध गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांसह बोगस उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अटक आरोपींच्या घरझडतीमध्ये बोगस उमेदवारांचे ३ अर्ज मिळाले आहेत. या संदर्भात तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: More than 400 bogus candidates