मोठी बातमी! शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, ५ उमेदवारांची घोषणा; निलेश लंकेंना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:24 PM2024-03-30T17:24:10+5:302024-03-30T17:29:03+5:30

Jayant Patil : राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे.

lok sabha election 2024 Big news First list of Sharad Pawar group released Nomination to Nilesh Lankan | मोठी बातमी! शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, ५ उमेदवारांची घोषणा; निलेश लंकेंना उमेदवारी

मोठी बातमी! शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, ५ उमेदवारांची घोषणा; निलेश लंकेंना उमेदवारी

Jayant Patil : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत पाच उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.  या यादीत नगर दक्षिणमधून निलेश लंके तर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज मुंबईत पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली.

महायुतीतील शिवसेना लोकसभेच्या किती जागा लढवणार? शिंदे गटाच्या आमदारानं थेट आकडाच सांगितला!

आज आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले,  कालच निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, त्यांच्या राजीनाम्याची रिसीट आज आम्हाला मिळाली. मैत्रिपूर्ण लढतीची काँग्रेसच्या नेत्यांनी मागणी केली आहे, पण अजून निर्णय झालेला नाही. आमचा सर्वच पक्षांना सोबत घ्यायचा प्रयत्न आहे. आमची अपेक्षा अशी आहे की, भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकीच बळ दाखवण्याची गरज आहे. काही लोक वेगळं उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं त्याने आपली मत फुटतील आणि पर्यायाने भाजपाच्या उमेदवाराला मदत होईल. याचा विचार करुन सगळेजण एकसंघ होण्याचा प्रयत्न करतील, असंही जयंत पाटील म्हणाले. 

या पाच उमेदवारांची नाव जाहीर

खा. सुप्रियाताई सुळे - बारामती
खा. अमोल कोल्हे - शिरुर
मा. निलेश लंके - नगर दक्षिण
 अमर काळे    - वर्धा
भास्करराव भगरे  - दिंडोरी 

दरम्यान, काल खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी तब्येतीचे कारण देत लोकसभा लढवण्यास नकार दिला आहे. यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघात नव्या उमेदवारासाठी चाचपणी सुरू आहे. काल बैठकीतून काही नेत्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.  पहिल्या यादीत माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारही जाहीर केलेला नाही, यामुळे आता माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील उमेदवार असतील की आणखी कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळेल याची चर्चा जोरदार सुरू आहे.

Web Title: lok sabha election 2024 Big news First list of Sharad Pawar group released Nomination to Nilesh Lankan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.