घरातून दागिने चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:06 IST2021-07-10T04:06:22+5:302021-07-10T04:06:22+5:30

मुंबई : मुलुंड डम्पिंग रोड परिसरात राहत्या घरातून ६४ हजार किमतीचे हार आणि सोनसाखळी चोरीला गेल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात ...

Jewelry stolen from the house | घरातून दागिने चोरीला

घरातून दागिने चोरीला

मुंबई : मुलुंड डम्पिंग रोड परिसरात राहत्या घरातून ६४ हजार किमतीचे हार आणि सोनसाखळी चोरीला गेल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पैसे व अन्य दागिने होते. याबाबत मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.

ओएलएक्सवरून फ्रीज विक्री पडली महागात

मुंबई : ओएलएक्सवरून फ्रीज विक्री करणे बोरिवलीतील ५३ वर्षीय गृहिणीला महागात पडले आहे. फ्रीज विकत घेण्याच्या नावाखाली ठगाने त्यांची १८ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी गुरुवारी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांत राहण्यास सांगितले म्हणून हल्ला

मुंबई : घरासमोर गोंधळ घालणाऱ्या तरुणाला शांत राहण्यास सांगितले म्हणून तरुणाने शशिकांत गुप्ता (३१) यांच्यावर चाकूने वार केले. मुलुंड पश्चिमेकडील शंकर टेकडी परिसरात गुप्ता राहण्यास आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता घरी असताना ही घटना घडली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Jewelry stolen from the house