महामार्गालगत बेकायदा खोदकाम

By Admin | Updated: June 3, 2015 22:37 IST2015-06-03T22:37:42+5:302015-06-03T22:37:42+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर गेली अनेक दिवसांपासून विविध खासगी दूरध्वनी कंपन्यांचे केबल टाकण्याचे काम सुरू आहेत. महामार्ग बांधकाम विभागाकडून

Highway illegal mining | महामार्गालगत बेकायदा खोदकाम

महामार्गालगत बेकायदा खोदकाम

दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर गेली अनेक दिवसांपासून विविध खासगी दूरध्वनी कंपन्यांचे केबल टाकण्याचे काम सुरू आहेत. महामार्ग बांधकाम विभागाकडून खोदकामासाठी परवानगी मिळण्याच्या आतच या कंपन्या चर खोदत आहेत. महामार्ग अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हे खोदकाम सुरू आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा संवेदनशील असून त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे केंद्रबिंदू झाले आहे. गेली अनेक वर्षे महामार्गावर शेकडो जणांचे बळी गेलेले आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम देखील ठप्प झाले आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यामध्ये इंदापूर ते कशेडी घाटापर्यंत प्रस्तावीत चौपदरीकरणाकरिता मोजणी देखील सुरू आहे. अशा महामार्गालगत अनेक वेळा खाजगी कंपन्या केबल टाकण्याकरिता खोदकाम करीत महामार्ग नियमांचे उल्लंघन करत आहेत. अनेक अपघातांकरिता केबलसाठी झालेले खोदकाम कारणीभूत ठरलेले आहे. सध्या महाड ते दासगाव विभागात नुकतेच एका खाजगी कंपनीने महामार्गालगत चर खोदण्याचे काम केले होते. त्यानंतर काही महिन्यातच आता पुन्हा एकदा रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मुळातच इंदापूर ते कशेडी चौपदरीकरणाचा प्रस्ताव असून अशा प्रकारचे खोदकाम करत असताना कोणत्याही प्रकारचा यंत्र वापर करावयाचा नसला तरी या खाजगी कंपन्या खुलेआमपणे जेसीबी व पोकलेन आदी मशीनरींचा वापर करताना दिसत आहेत.
चौपदरीकरणात हे काम येत असल्याने त्यांना काम थांबवण्याचा तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र काम सुरू असून या कामाच्या परवानगीसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेला आहे. या कामास खात्याकडून परवानगी मिळालेली नाही असे शाखा अभियंता आर. एच. बागडे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Highway illegal mining