विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 06:45 IST2020-05-24T23:44:22+5:302020-05-25T06:45:31+5:30

राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमान

Heat wave in Vidarbha, Marathwada, Central Maharashtra; Meteorological Department warning | विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

मुंबई : मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. २५ आणि २६ मे रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहोचले आहे. आता पुढील काही दिवस कमाल तापमानाचा पारा असाच चढा राहणार आहे.

२५ मे : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल.
२६ मे : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.
२७ मे : विदर्भात उष्णतेची लाट येईल.
नागपूर ४६.५
अकोला ४६
अमरावती ४५.६
चंद्रपूर ४५.६
वर्धा ४५.५
परभणी ४५.४
गोंदिया ४५.४
जळगाव ४५
मालेगाव ४४.४
सोलापूर ४४.२
नांदेड ४४
बुलडाणा ४३
वाशिम ४२.६
औरंगाबाद ४२.२
सातारा ४०.१

Web Title: Heat wave in Vidarbha, Marathwada, Central Maharashtra; Meteorological Department warning