आरे जंगल परिसरात आग; धुराचे मोठे लोट, नागरिकांमध्ये चिंता

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 7, 2026 22:28 IST2026-05-07T22:27:57+5:302026-05-07T22:28:28+5:30

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

fire in aarey forest area large plume of smoke concern among citizens | आरे जंगल परिसरात आग; धुराचे मोठे लोट, नागरिकांमध्ये चिंता

आरे जंगल परिसरात आग; धुराचे मोठे लोट, नागरिकांमध्ये चिंता

मनोहर कुंभेजकर, मुंबई-आरे परिसरात आज गुरुवारी सायंकाळी  आग लागल्याची घटना घडली. न्यू दिंडोशी,गोरेगाव (पूर्व )येथील इन्फिनिटीआयआयटी पार्क परिसरातील जंगल भागात ही आग लागली होती.सायंकाळी ७:३२ वाजता मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली. 

माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, वन विभाग तसेच वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग एफ. ई. दिनशॉ ट्रस्ट लँड अर्थात रहेजा परिसरात लागली होती , यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. 

आगीमुळे परिसरात धुराचे  लोट पसरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते . सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आगीवर मुंबई अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title : आरे जंगल क्षेत्र में आग; धुंआ फैला, नागरिक चिंतित।

Web Summary : गुरुवार शाम गोरेगांव (पूर्व) के इंफिनिटी आईटी पार्क के पास आरे जंगल में आग लग गई। दमकल कर्मियों ने तुरंत कार्रवाई कर आग पर काबू पा लिया। कारण अज्ञात है, लेकिन किसी के हताहत होने की खबर नहीं है, जिससे नागरिकों की चिंता कम हुई।

Web Title : Fire in Aarey forest area; smoke spreads, citizens worried.

Web Summary : A fire broke out in the Aarey forest near Infinity IT Park, Goregaon (East) on Thursday evening. Firefighters quickly responded and controlled the blaze. While the cause remains unknown, no casualties were reported, easing citizen concerns.