‘बंच ऑफ कनेक्शन’ मोहिमेमुळे अनधिकृत जलवाहिन्यांना जोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 01:43 AM2020-01-16T01:43:56+5:302020-01-16T01:44:10+5:30

पी उत्तर विभागाचे दुर्लक्ष : मालवणीच्या राठोडी गावातील प्रकार

Emphasis on unauthorized waterways through 'Bunch of Connections' campaign | ‘बंच ऑफ कनेक्शन’ मोहिमेमुळे अनधिकृत जलवाहिन्यांना जोर

‘बंच ऑफ कनेक्शन’ मोहिमेमुळे अनधिकृत जलवाहिन्यांना जोर

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर 

मुंबई: मालवणीच्या राठोडी परिसरात पसरलेल्या जलवाहिन्यांच्या जाळ्यामुळे स्थानीकांचे साधे चालणे देखील कठीण होऊन बसले आहे. यावर उपाययोजना म्हणुन महापालिकेकडून रीमुव्हल बंच आॅफ कनेक्शन ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. याचा फायदा स्थानिक प्लंबर घेत असुन गोरगरिबांना लुबाडत असल्याचे उघड झाले आहे.

राठोडी गावात असलेल्या विभाग क्रमांक ३३ मध्ये ह्यरीमुव्हल बंच आॅफ कनेक्शनह्ण ही मोहीम पालिकेच्या पी उत्तर विभागाने हाती घेतली आहे. यानुसार गल्ल्या व चाळीमध्ये एकावर एक पाण्याचे पाईप आल्याने त्यांचा एक मोठा ढीग तयार झाला आहे. या ढिगामुळे लहान मुले तसेच मोठी माणसे त्यात अडखळून पडल्याने जखमी झाल्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळेच वीस ते पंचवीस पाईप काढून त्याजागी एकच सहा इंचाची जलवाहिनी बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र या खंडित करण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपमधुन चोरीची नवीन जलवाहिनी देऊन स्थानिकांकडून ५० हजार ते १ लाख रुपये उकळण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या प्लंबरची चलती असुन पालिकेचे काही कर्मचारीही त्यांना सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. राठोडीच्या ओमजी कंपाऊंडमध्ये अशाच प्रकारे जलवाहिनीचे काम सुरू होते. तेव्हा ते काम करणा?्या प्लंबरचा फोटो काढून स्थानिकांनी पालिकेच्या जलविभाग अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. त्यावेळी संबंधित अधिका?्यांनी घटनास्थळी धाड टाकली आणि त्यांना जलवाहिनीची जोडणी करणारे प्लंबर त्यांना रंगेहाथ सापडले. इतका वेळ अधिकृत जलवाहिनीचे काम सुरू असल्याचे सांगणाºया प्लंबरनी घटनास्थळाहुन धुम ठोकली. गल्लीच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर झाल्यास या समस्येतून सुटका होईल असे स्थानिकांचे म्हणणे आहे.


ह्यराठोडीची स्थिती सध्या फारच खराब असुन मी स्वच्छता अभियान राबवत ड्रेनेज लाईन साफ करुन घेत आहे. त्यानंतर याठिकाणी असलेल्या गल्ल्यांच्या दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर हाती घेऊन स्थानिकांना या त्रासापासून मुक्त करणार आहे. - वीरेंद्र चौधरी, स्थानिक नगरसेवक

आम्हाला तक्रार मिळल्यानंतर मी जलविभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला त्याठिकाणी पाठवले. मात्र सदर प्लंबर तिथुन पसार झाला. त्यानुसार मी स्वत: गुरुवारी त्याठिकाणी भेट देणार असुन कागदपत्रे तपासून संबंधितांवर कारवाई करत अनधिकृत जलवाहिनीचा पाणी पुरवठा खंडीत करणार आहे. - ए. कोरे - दुय्यम अभियंता जलविभाग, पी उत्तर विभाग

Web Title: Emphasis on unauthorized waterways through 'Bunch of Connections' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी