देवनार कचराभूमीवर अखेर साकार होणार वीज प्रकल्प, आठ वर्षांची प्रतीक्षा संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 05:08 AM2020-01-29T05:08:26+5:302020-01-29T05:08:39+5:30

मुलुंडपाठोपाठ देवनार या सर्वात मोठ्या डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली आहे.

The eight-year wait for the power plant, which will finally be realized on Deonar waste land, is over | देवनार कचराभूमीवर अखेर साकार होणार वीज प्रकल्प, आठ वर्षांची प्रतीक्षा संपली

देवनार कचराभूमीवर अखेर साकार होणार वीज प्रकल्प, आठ वर्षांची प्रतीक्षा संपली

Next

मुंबई : अखेर आठ वर्षांनंतर कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचे महापालिकेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. मुंबईतील कचºयाचा प्रश्न मिटवण्यासाठी २०१३मध्ये देवनार डम्पिंग ग्राउंडवर वीजनिर्मिती करण्याचा निर्णय २०१३मध्ये आणला. मात्र एकाच वेळी तीन हजार मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेली कोणतीच कंपनी पुढे आली नाही. यामुळे हा प्रकल्प बराच काळ रखडला होता. त्यामुळे यात बदल करीत आता प्रतिदिन ६०० मेट्रिक टन कचºयापासून चार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने मांडला आहे.
मुलुंडपाठोपाठ देवनार या सर्वात मोठ्या डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे हा डम्पिंग ग्राउंडही टप्प्याटप्प्याने शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. परंतु, कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व मोठ्या सोसायट्यांना आपल्या आवारातच ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचे स्वप्न महापालिकेने २०१३मध्ये पाहिले होते. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार होता. नोव्हेंबर २०१५मध्ये टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स या कंपनीची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.
देवनार डम्पिंग ग्राउंडवर दररोज तीन हजार मेट्रिक टन कचºयापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. इच्छुक ठेकेदारांना निविदा भरण्यासाठी सात वेळा मुदत वाढवून देण्यात आली. मात्र ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने प्रतिदिन तीन हजारऐवजी ६०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावणाºया चेन्नई येथील एम.एस.डब्ल्यू. प्रा. लि. कंपनीला हे काम देण्यात येणार आहे.

१५ वर्षांसाठी देणार कंत्राट!
मुंबईत दररोज सात हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर या कचºयाची विल्हेवाट लावली जाते.
दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणाºया मोठ्या सोसायट्यांना त्यांच्या आवारात ओल्या कचºयावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सुका-ओला कचरा वेगळा करणे, ओल्या कचºयावर प्रक्रिया करणे यावर अंमल करणाºया सोसायट्यांना मालमत्ता करात सूट देण्यात येत आहे.
चेन्नईच्या कंपनीला निव्वळ वर्तमान मूल्य ६४८ कोटी दोन लाख ३३ हजार रुपयांसह १५ वर्षांसाठी प्रकल्प कालावधी किंमत १,०५६ कोटी १२ लाख रुपये असे कंत्राट देण्यात येणार आहे. देवनार कचराभूमीमधील कचºयाचा भार कमी करण्यासाठी तातडीने हा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे.

Web Title: The eight-year wait for the power plant, which will finally be realized on Deonar waste land, is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई