शेळीपालनाच्या नावाने ड्रग्ज कारखाना; फार्म हाऊसची पोलिस घेणार झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 06:29 IST2025-05-29T06:29:06+5:302025-05-29T06:29:06+5:30

कर्जत पोलिस  फार्म हाऊस संघटनेच्या सदस्यांची बैठक घेऊन चर्चा करणार

Drug factory in Karjat under the guise of goat farming | शेळीपालनाच्या नावाने ड्रग्ज कारखाना; फार्म हाऊसची पोलिस घेणार झाडाझडती

शेळीपालनाच्या नावाने ड्रग्ज कारखाना; फार्म हाऊसची पोलिस घेणार झाडाझडती

मुंबई : कर्जतमध्ये शेळीपालन व्यवसायाच्या आड सुरू असलेला एमडी कारखाना मंगळवारी उद्ध्वस्त करत परिमंडळ सहाने २४ कोटी ४२ लाखांचा एमडी साठा, कच्चा माल हस्तगत केला. या प्रकरणी ६ आरोपींना अटक केली आहे. यानंतर कर्जत पोलिस  फार्म हाऊस संघटनेच्या सदस्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तसेच चौकशीही केली जाणार आहे.  

पोलिसांच्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी आरसीएफ पोलिस ठाण्यातील पथक गस्त करताना एकाला ४५ ग्रॅम एमडीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. पथकाने अटक आरोपीसोबत अमली पदार्थ विक्री करणाऱ्या पाच जणांना मुंबई आणि नवी मुंबई येथून बेड्या ठोकल्या.  आरोपींकडून १३ कोटी ३७ लाख किमतीचा ६ किलो ६८९ ग्रॅम वजनाचा एमडी १५ मे रोजी हस्तगत केला. आरोपींच्या चौकशीतून सावली फार्म हाऊस, कर्जत  येथे शेळीपालन व्यवसाय करत असल्याचे भासवून एमडी तयार करत असल्याचे स्पष्ट झाले. येथे एकाला अटक केली. फॅक्टरीमधून ११ कोटी ५ लाख किमतीचा एमडी व एक कोटी किमतीचा कच्चा माल हस्तगत केला. पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळेंच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
 

Web Title: Drug factory in Karjat under the guise of goat farming