अनेक उपाययोजना करूनही मुंबई तुंबलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:01 AM2020-09-25T01:01:09+5:302020-09-25T01:01:28+5:30

शेफाली परब-पंडीत, सचिन लुंगसे । लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मान्सूनच्या शेवटच्या महिन्यातही मुसळधार पावसाने मुंबईला दणका दिला. कुठे ...

Despite many measures, Mumbai is still full | अनेक उपाययोजना करूनही मुंबई तुंबलीच

अनेक उपाययोजना करूनही मुंबई तुंबलीच

Next

शेफाली परब-पंडीत,
सचिन लुंगसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्सूनच्या शेवटच्या महिन्यातही मुसळधार पावसाने मुंबईला दणका दिला. कुठे नाले तुंबले तर कुठे उदंचन केंद्र्र बंद पडले. यंदाच्या पावसाळ्यात आणखी काही नवीन ठिकाणे पाण्याखाली गेली. २४ तासांच्या कालावधीत तब्बल साडेसहा ते पावणेसात हजार दशलक्ष लीटर पाणी उपसण्यात आले. या परिस्थितीला अतिवृष्टी जबाबदार असल्याचा बचाव पालिका प्रशासन करीत आहे. तर पर्यावरणप्रेमी, रहिवासी, राजकीय पक्ष मात्र कोस्टल रोड, मेट्रो रेल्वेसारखे प्रकल्प, नालेसफाईचा बोजवारा यास कारणीभूत असल्याचा आरोप करीत आहेत. परंतु, १५ वर्षे अनेक उपाययोजना केल्यानंतरही तुंबापुरी हेच चित्र कायम आहे.


५ आॅगस्ट रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होऊन अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी पुन्हा विक्रमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबले, मात्र काही ठिकाणी पावसाचा निचरा होण्यास बराच वेळ लागला. गोल देऊळ, ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल, दादर टीटी, परळ, हिंदमाता या ठिकाणी दहा तासांहून अधिक काळ पाणी तुंबले होते. मेट्रो रेल्वे आणि सागरी किनारा मार्ग या प्रकल्पांचे काम सुरू झाल्यापासून पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत.


म्हणून तुंबते दक्षिण मुंबईत पाणी..
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पअंतर्गत ब्रिटिशकालीन पर्जन्य वाहिन्यांची क्षमता वाढवून ताशी ५० मि.मी. पावसाचे पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र दक्षिण मुंबईतील काही वाहिन्या अद्यापही २५ मिलिमीटर पावसाचे पाणी वाहून नेऊ शकतात. परंतु बुधवारी १०० मिमीहून अधिक पाऊस झाल्याने पाणी तुंबले व त्याचा निचरा होण्यास बराच कालावधी लागला.


नालेसफाईचा बोजवारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका यंत्रणा गेले सहा महिने व्यस्त आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होणारी नालेसफाई मे महिन्यात सुरू झाली. अवघ्या दोन-तीन आठवड्यातच मुंबईत ११६ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता.


ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या चौकशीची मागणी
बुधवारी मुसळधार पाऊस कोसळत असताना रात्री समुद्रात मोठी भरती असल्याने बेटाने पंपिंग स्टेशनला पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य वाहिन्या भरल्या होत्या. दक्षिण मुंबईतील केंद्र पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकरणाची
चौकशी करण्याची मागणी समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मान्सूनचा धमाका
1मंगळवारसह बुधवारी मुंबईला झोडपून काढणाºया पावसाची गुरुवारी सकाळी ८ वाजता १०८.७ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. सलग दोन दिवस कोसळलेल्या मुसळधारेने गुरुवारी मात्र विश्रांती घेतली; आणि मुंबईकरांची सकाळ सूर्यनारायणाच्या दर्शनाने झाली. मुंबईवर दाटून आलेले पावसाचे ढग गुरुवारी दूरवर गेल्याने मुंबईत दिवसभर बºयापैकी उन्हाने खेळ मांडल्याचे चित्र होते. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत १०० ते ७० मिलीमीटरदरम्यान पाऊस नोंदविण्यात आला आहे.
2मंगळवारी रात्री मुंबईत तुफान पाऊस पडला. यामुळे बुधवारी मुंबई ठप्प झाली. बुधवारी पाऊस लागून राहिला असला तरी त्याचे प्रमाण कमी होते. परिणामी फार कोठे पाणी साचले नाही. गुरुवारी तर पावसाने बºयापैकी उघडीप घेतली.
3गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसामुळे जेथे पाणी साचले होते त्या पाण्याचा निचरा पूर्णत: करण्यात आला. पावसाने विश्रांती घेतली असली तरी एकूण
६ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला.
२० ठिकाणी झाडे कोसळली. ३४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.
4तर मुंबईच्या हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. १०० ते ७० मिलीमीटरदरम्यान हा पाऊस नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Despite many measures, Mumbai is still full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस