डहाणू बंद यशस्वी

By Admin | Updated: June 20, 2015 23:16 IST2015-06-20T23:16:39+5:302015-06-20T23:16:39+5:30

डहाणू तालुक्यावर केंद्र सरकारने २० जुन २९९१ रोजीच्या अधिसुचनेद्वारे लादलेल्या उद्योगबंदीला २४ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या निषेधार्थ

Dahanu succeeded off | डहाणू बंद यशस्वी

डहाणू बंद यशस्वी

डहाणू : डहाणू तालुक्यावर केंद्र सरकारने २० जुन २९९१ रोजीच्या अधिसुचनेद्वारे लादलेल्या उद्योगबंदीला २४ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या निषेधार्थ शनिवारी काळा दिवस पाळून सर्वपक्षीयांनी पाळलेला डहाणू बंद पुर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा राजेश पारेख, रविंद्र फाटक, मिहिर शहा यांनी केला आहे.
डहाणू तालुक्यावर २० जुन १९९१ मध्ये केंद्र सरकारने अधिसुचना काढून उद्योगबंदी लागू केली. त्यामुळे या ठिकाणी कोणताही उद्योगधंदा काढता येत नाही. ही उद्योगबंदी रद्द करण्यासाठी डहाणू इन्डस्ट्रियल असोसिएशनने गेली २४ वर्षे सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. त्यामुळे डहाणूचा विकासच खुंटला गेला आणि येथील युवावर्ग रोजगारासाठी बाहेर पडू लागला. डहाणूवर उद्योगबंदी लादल्याच्या घटनेला २४ वर्षे पुर्ण होत असल्याने डहाणू विकास परिषदेने या घटनेच्या निषेध म्हणून सर्वपक्षीय काळा दिवस पाळून कडकडीत बंदचे आयोजन केले होते. (वार्ताहर)

Web Title: Dahanu succeeded off