CoronaVirus News : पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 01:37 AM2021-04-13T01:37:03+5:302021-04-13T01:37:26+5:30

CoronaVirus News : दगडे हे अंधेरी पूर्व परिसरात दोन मुलगे आणि पत्नी यांच्यासह राहत होते. त्यांची पत्नी गृहिणी असून, मुले शिक्षण घेत आहेत.

CoronaVirus News: Sub-Inspector of Police dies due to corona infection | CoronaVirus News : पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू

CoronaVirus News : पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू

Next

मुंबई : कोरोनाने सोमवारी एका पोलिसाचा बळी घेतला. मोहन दगडे (५४) असे या पोलिसाचे नाव असून, ते वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या मृत्युमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दगडे हे अंधेरी पूर्व परिसरात दोन मुलगे आणि पत्नी यांच्यासह राहत होते. त्यांची पत्नी गृहिणी असून, मुले शिक्षण घेत आहेत. वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च, २०२१ रोजी ऑक्सिजन कमी झाल्याने दगडे यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांना तातडीने वांद्रेतील बीकेसी कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते.
दगडे हे वरिष्ठ, सहकाऱ्यांशी रविवारपर्यंत संपर्कात होते; सोमवारी अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसल्याचे नटे यांनी सांगितले. याबाबत समजताच नटे आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे धाव घेत त्यांना धीर दिला, तसेच वाकोला पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही योग्य ती पावले तातडीने उचलल्याचे नटे यांनी नमूद केले.
 

Web Title: CoronaVirus News: Sub-Inspector of Police dies due to corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.