मतदार यादीतील नावांच्या मॅपिंगबाबत बीएलओंना सहकार्य करा : आंचल गाेयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:24 IST2026-05-18T08:23:40+5:302026-05-18T08:24:05+5:30

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नाट्यगृहात मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या समाधान शिबिरात त्या बोलत होत्या.

Cooperate with BLOs regarding mapping of names in voter list: Aanchal Goyal | मतदार यादीतील नावांच्या मॅपिंगबाबत बीएलओंना सहकार्य करा : आंचल गाेयल

मतदार यादीतील नावांच्या मॅपिंगबाबत बीएलओंना सहकार्य करा : आंचल गाेयल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर)अंतर्गत मतदार यादीतील नावांच्या मॅपिंगबाबत घरोघरी जाऊन काम करणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावे. नागरिकांनी २००२ च्या मतदार यादीतील आपले नोंद शोधून तयार ठेवावी. तसेच ‘व्होटर सर्व्हिस पोर्टल’चा वापर करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल 
यांनी केले.

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नाट्यगृहात मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या समाधान शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी मुंबई शहर उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश सांगळे, प्रशांत पानवेकर, तहसीलदार राजेश वैष्णव, संकेत यमगर आदी उपस्थित होते.
नागरिकांनी घरबसल्या शासनाच्या सर्व ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊन वेळ व पैशांची बचत करावी. राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध अनेक सेवांचा नागरिकांनी, विशेषत: तरुण पिढीने ऑनलाइन अर्ज करून लाभ घ्यावा. बहुतांश सेवांसाठी योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास ठरावीक कालमर्यादेत प्रमाणपत्र उपलब्ध करणे ही प्रशासनाची कायदेशीर जबाबदारी आहे, असे गोयल यांनी सांगितले.

‘महाराजस्व अभियान नियमित सुरू राहणार’
महाराजस्व अभियान हा 
केवळ शिबिरापुरता मर्यादित उपक्रम नसून सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. शिबीरे संपल्यानंतरही दाखले वाटप व इतर सेवा नियमित सुरू राहतील, असे त्या म्हणाल्या. 
यावेळी महसूल विभागासह 
इतर विविध विभागांच्या स्टॉलवरून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, योजनांची माहिती व लाभ देण्यात आले. 
२८ वेगवेगळ्या विभागाच्या स्टॉल्सला जवळपास ४५० नागरिकांनी भेट दिली. ६७ नागरिकांना प्रत्यक्ष लाभ तर १२२ नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

Web Title : मतदाता सूची मैपिंग के लिए बीएलओ का सहयोग करें: आंचल गोयल

Web Summary : आंचल गोयल ने मतदाता सूची मैपिंग में बीएलओ की सहायता करने, वोटर सर्विस पोर्टल का उपयोग करने और रिकॉर्ड तैयार रखने का आग्रह किया। ऑनलाइन सरकारी सेवाएं समय और धन बचाती हैं। महाराजस्व अभियान शिविरों से परे जारी है, प्रमाण पत्र और जानकारी प्रदान करता है।

Web Title : Cooperate with BLOs for Voter List Mapping: Aanchal Goyal

Web Summary : Collector Aanchal Goyal urges citizens to assist BLOs in voter list mapping, utilizing Voter Service Portal and keeping records ready. Online government services save time and money. Maharajsw Abhiyan continues beyond camps, offering certificates and information.