नाणार रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 09:52 AM2021-03-11T09:52:47+5:302021-03-11T09:52:57+5:30

उद्धव ठाकरे यांनी देखील नाणारबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

CM Uddhav Thackeray's big statement about Nanar refinery; Letter written by MNS Chief Raj Thackeray a few days ago! | नाणार रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र!

नाणार रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र!

Next

मुंबई: कोरोनानंतर राज्याचे अर्थचक्र पुन्हा रूळावर आणण्यासाठी नाणार रिफायनरी सारखे प्रकल्प  (Nanar Refinery Project)  अत्यंत महत्वाचे आहेत. अशी गुंतवणूक राज्याबाहेर जाता कामा नये, यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पाठविले होते. 

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मी पत्राद्वारे मांडलेली भूमिका अत्यंत योग्य असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आपल्याला फोनवर सांगितले आहे. ते स्वतः कदाचित या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, असा खुलासा राज ठाकरे यांनी सोमवारी नाणार येथील शिष्टमंडळासमोर केला. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील नाणारबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यानेच तेथून प्रकल्प हटविण्यात आला असून, त्या ठिकाणी रिफायनरी न करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. आम्हाला वाटते म्हणून एखाद्या उद्योगाला विरोध किंवा पाठिंबा देत नाही. यापूर्वी स्थानिकांचा विरोध असल्यामुळेच आम्ही तेथून प्रकल्प दुसरीकडे हलविण्याचा निर्णय घेतला होता. असं म्हणत आता कोणाला स्वागत करायचे असेल, तर ते करू शकतात, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला. तसेच रिफायनरीला नाणारऐवजी दुसरी पर्यारी जागा देणार आहे. मात्र, हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

नाणार प्रकल्पाच्या बाजूने राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर नाणार येथील रहिवाशांचे आणि समाजसेवी संस्थेच्या शिष्टमंडळाने सोमवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली होती. नोटबंदी ते कोरोना या सर्व घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाले आहेत. आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नाणारसारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नयेत. मात्र, अशा प्रकल्पातून तयार होणारा रोजगार स्थानिकांच्या आणि मराठी माणसांना मिळायला हवा. यासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचेही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले होते.

कोकणात आपल्याला पर्यटनावरच आधारित रोजगारनिर्मिती करायला हवी आणि भविष्यात त्यावरच लक्ष केंद्रित करू. पण नोटबंदी ते कोरोना ह्याकाळात प्रचंड बेरोजगारी वाढली. अशा ह्या विदारक स्थितीत ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नयेत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट होते.

दरम्यान, राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून, आम्ही त्याचे स्वागत करतो. मला त्यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. शिवाय, नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प ही ग्रीन रिफायनरी आहे. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. 

Web Title: CM Uddhav Thackeray's big statement about Nanar refinery; Letter written by MNS Chief Raj Thackeray a few days ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.