छोटा शकीलचा मेहुणा अटकेत

By Admin | Updated: March 18, 2016 01:31 IST2016-03-18T01:31:38+5:302016-03-18T01:31:38+5:30

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा अरिफ अबुबकार शेख उर्फ अरिफ भाईजानला (४३) गुरुवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली.

Chhota Shakeel Mehunya detained | छोटा शकीलचा मेहुणा अटकेत

छोटा शकीलचा मेहुणा अटकेत

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा अरिफ अबुबकार शेख उर्फ अरिफ भाईजानला (४३) गुरुवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली. बांगूरनगर परिसरातील टायर विक्रेत्याकडून त्याने ७२ लाखांहून अधिक खंडणी उकळली होती.
अरिफ भाईजान हा छोटा शकीलच्या तीन बहिणींपैकी एकीचा पती आहे. अंडरवर्ल्डमध्ये भाईजान म्हणून तो ओळखला जातो. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा टायर विक्रीचा व्यवसाय असून ते बांगूरनगर परिसरात राहतात. २०१३ पासून फेब्रुवारी २०१६ पर्यंत भाईजानने त्याच्याकडून तब्बल ७२ लाख रुपये उकळले. अखेर त्यांनी २० फेब्रुवारी रोजी बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भाईजानविरुद्ध खंडणीप्रकरणी अधिक तपास सुरू असताना गुप्त माहितीदारांमार्फत भाईजानचा ठावठिकाणा पोलिसांना समजला. त्यानुसार शनिवारी सापळा रचून खंडणीविरोधी पथकाने भाईजानच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Chhota Shakeel Mehunya detained