मुंबईत शिंदेसेनेसह भाजपा आणि उद्धवसेनेनेही खातं उघडलं; कोणत्या वार्डात कोण जिंकलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:13 IST2026-01-16T12:12:39+5:302026-01-16T12:13:32+5:30

मुंबई महापालिकेच्या मतमोजणीचे निकाल आता समोर येत आहे. त्यात भाजपा, शिंदेसेनेसह उद्धवसेनेने खाते उघडले आहे.

BMC Election: Along with Eknath Shinde Sena, BJP and Uddhav Sena also win in Mumbai; Who won in which ward? | मुंबईत शिंदेसेनेसह भाजपा आणि उद्धवसेनेनेही खातं उघडलं; कोणत्या वार्डात कोण जिंकलं?

मुंबईत शिंदेसेनेसह भाजपा आणि उद्धवसेनेनेही खातं उघडलं; कोणत्या वार्डात कोण जिंकलं?

मुंबई - महापालिका निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले आहे. निकालांच्या सुरुवातीच्या कलापासून भाजपा महायुतीने मुंबईत आघाडी घेतली आहे. त्यात शिंदेसेनेचे २ उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक १ मधून शिंदेसेनेच्या रेखा यादव यांचा विजय झाला आहे. याठिकाणी उद्धवसेनेचे उमेदवार फोरम परमार यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे वार्ड क्रमांक १६३ याठिकाणी शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे यादेखील विजयी झाल्या आहेत. 

वार्ड क्रमांक १६३ मध्ये उद्धवसेनेकडून संगीता सावंत या शैला लांडे यांच्या विरोधात उभ्या होत्या. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासोबतच मुंबईतील वार्ड क्रमांक १८२ मधून उद्धवसेनेचे मिलिंद वैद्य हे विजयी झाले आहेत. त्यांच्यासमोर भाजपाचे राजन पारकर आणि अपक्ष उमेदवार महेश धनमेहर प्रमुख प्रतिस्पर्धी होते. वार्ड क्रमांक १ मध्ये उद्धवसेनेच्या फोरम परमार, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांचा पराभव करून शिंदेसेनेच्या रेखा यादव या विजयी झाल्या आहेत. 

मुंबईच्या वार्ड क्रमांक २ मध्ये उद्धवसेनेकडून धनश्री कोलगे आणि भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर यांच्यात लढत होती. मात्र या जागेवर भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर यांनी विजय मिळवला आहे. जवळपास १६ हजार ४८४ मते तेजस्वी घोसाळकर यांना मिळाली आहे. वार्ड क्रमांक १३५ मधून भाजपाचे नवनाथ बन यांनी विजय मिळवला आहे. याठिकाणी समीक्षा दीपक सक्रे यांना उद्धवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती. त्याशिवाय काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही उमेदवार या वार्डात होते. मात्र बन यांनी विरोधी उमेदवारांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

Web Title : मुंबई चुनाव: शिंदे सेना, भाजपा और उद्धव सेना ने खाते खोले

Web Summary : मुंबई नगर निगम चुनाव परिणामों में शिंदे सेना, भाजपा और उद्धव सेना ने वार्ड जीते। शिंदे सेना की रेखा यादव और शैला लांडे, भाजपा के तेजस्वी घोसालकर और नवनाथ बन, और उद्धव सेना के मिलिंद वैद्य की प्रमुख जीत। वार्डों में कड़ी प्रतिस्पर्धा रही।

Web Title : Mumbai Elections: Shinde Sena, BJP, and Uddhav Sena Open Accounts

Web Summary : Mumbai's municipal election results see Shinde Sena, BJP, and Uddhav Sena winning wards. Key victories include Shinde Sena's Rekha Yadav and Shaila Lande, BJP's Tejaswi Ghosalkar and Navnath Ban, and Uddhav Sena's Milind Vaidya. Competition was fierce across wards.