क्रिकेट सामना अर्धवट सोडल्याने हल्ला, अल्पवयीन मुले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:35 IST2026-04-14T13:34:56+5:302026-04-14T13:35:17+5:30

Mumbai Crime News:क्रिकेट सामना अर्धवट सोडून गेल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मित्रांनी १४ वर्षीय मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. गोवंडीतील राजीव गांधी मैदानात ११ एप्रिलला रोजी रात्री ही घटना घडली आहे.

Attacked after cricket match was abandoned, minors taken into custody | क्रिकेट सामना अर्धवट सोडल्याने हल्ला, अल्पवयीन मुले ताब्यात

क्रिकेट सामना अर्धवट सोडल्याने हल्ला, अल्पवयीन मुले ताब्यात

 मुंबई  -  क्रिकेट सामना अर्धवट सोडून गेल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मित्रांनी १४ वर्षीय मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. गोवंडीतील राजीव गांधी मैदानात ११ एप्रिलला रोजी रात्री ही घटना घडली आहे. अरसलान नाटेकर (रा. बैंगनवाडी) असे जखमी मुलाचे नाव असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अल्पवयीन मुले ताब्यात
शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत डोंगरी बालसुधारगृहात पाठवले आहे. घटनेच्या दिवशी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास अरसलान हा त्याच्या दोन मित्रांसोबत क्रिकेट मॅच खेळायला गेला होता. भाऊ अरफान नाटेकर (२०) याने त्याला आवाज देऊन त्यांच्या झेरॉक्स दुकानात बोलावले. अरसलान हा त्याची क्रिकेट मॅच अर्धवट सोडून दुकानात आला. 

मैदानात नेऊन चाकूने केले वार 
एका मित्राने रात्री अरसलान याला राजीव गांधी मैदानात नेले. येथे दोन मित्रांनी त्याच्याशी वाद घालून जिवे ठार मारण्याची धमकी देत चाकूने वार केले. 

Web Title : क्रिकेट मैच अधूरा छोड़ने पर हमला, नाबालिग हिरासत में

Web Summary : गोवंडी में क्रिकेट मैच अधूरा छोड़ने पर 14 वर्षीय लड़के पर चाकू से हमला हुआ। दो नाबालिग दोस्तों ने गुस्से में आकर हमला किया। पुलिस ने दोनों नाबालिगों को हिरासत में लेकर बाल सुधार गृह भेज दिया है।

Web Title : Cricket Match Abandoned: Attack, Minors Detained in Govandi

Web Summary : A 14-year-old was stabbed in Govandi for leaving a cricket match early. Two minor friends, enraged by his departure, attacked him with a knife. Police have detained the two minors and sent them to a juvenile detention center.