Union budget 2025: महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 05:22 IST2025-02-02T05:21:47+5:302025-02-02T05:22:41+5:30

Union budget 2025 Maharashtra: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या तरतूद आणि कोणत्या प्रकल्पांसाठी निधी देण्यात आला आहे, याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Union budget 2025: What is Maharashtra's share from the Union Budget? | Union budget 2025: महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय?

Union budget 2025: महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर द्वीट करुन केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले, याची माहिती दिली. मात्र, ही केवळ प्राथमिक माहिती आहे. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले आहे.

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र! (आकडेवारी कोटी रुपयांमध्ये)

- मुंबई मेट्रो > १२५५.०६

- पुणे मेट्रो > ६९९.१३

- एमयूटीपी > ६११.४८

- एमएमआरसाठी एकात्मिक, हरित प्रवासी सुविधा > ७९२.३५

- मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे > ४००४.३१

- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर > १०९४.५८

- महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प > ६८३.५१

- महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क > ५९६.५७

- नागनदी सुधार प्रकल्प > २९५.६४

- मुळा-मुठा नदी संवर्धन > २२९.९४

- ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प > १८६.४४

Web Title: Union budget 2025: What is Maharashtra's share from the Union Budget?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.