Maharashrra Voting 2019 Live: धक्कादायक;  नदी पार करून मतदानाला येण्यासाठी मुस्ती ग्रामस्थांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 09:57 AM2019-10-21T09:57:29+5:302019-10-21T10:02:25+5:30

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मुस्ती येथील प्रकार

Shocking; Villagers clash for crossing river | Maharashrra Voting 2019 Live: धक्कादायक;  नदी पार करून मतदानाला येण्यासाठी मुस्ती ग्रामस्थांची धडपड

Maharashrra Voting 2019 Live: धक्कादायक;  नदी पार करून मतदानाला येण्यासाठी मुस्ती ग्रामस्थांची धडपड

Next
ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात विधानसभा मतदानाला सुरूवात- पावसामुळे सकाळच्या सत्रात मतदान अत्यल्प- शहरातील अनेक मतदान केंद्रात पाणीच पाणी

सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील बेघर वस्तीत राहणाºया मतदारांना नदी पार करून मतदानासाठी यावे लागत आहे़ लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी बेघर वस्तीत राहणाºया ग्रामस्थांनी मतदान करण्यासाठी नदीपार करून येण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मुस्ती (ता़ दक्षिण सोलापूर) हे गाव़ गावापासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर वस्ती आहे़ वस्ती व गाव यामध्ये हरणा नदी आहे़ या हरणा नदीला पूर आल्याने गाव परिसरात पाणीच पाणी झाले आहे.

आज विधानसभा मतदानापासून वस्तीबाहेर पडणाºया प्रत्येक ग्रामस्थांनी नदीपार करून मतदानासाठी यावे लागत आहे़ याबाबत जिल्हा निवडणुक शाखेला माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या संबंधित ग्रामस्थांना मदत करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत़ नदीपार करून येणाºया ग्रामस्थांना मुस्ती -दर्शनाळ - बोरेगाव- धोत्री- बोरामणी - संगदरीमार्गे मुस्ती २८ किलोमीटर पार करून मतदानाला यावे लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Shocking; Villagers clash for crossing river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.