Ramdas athavale announces names of six candidates from RPI in mumbai | Maharashtra Election 2019: रामदास आठवलेंकडून 'रिपाइं'च्या सर्वच 6 उमेदवारांची नावे जाहीर
Maharashtra Election 2019: रामदास आठवलेंकडून 'रिपाइं'च्या सर्वच 6 उमेदवारांची नावे जाहीर

मुंबई -  रिपब्लिकन पक्षाचे विधानसभा निवडणुकीतील महायुती तर्फे अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली. महायुतीच्या जागावाटपात रिपाइंला 6 जागा देण्यात आल्या होत्या. या सहाही जागेवरील उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

माळशिरस - डॉ विवेक गुजर
फलटण - दिगंबर आगाव
पाथरी - आ. मोहन फड 
नायगाव - राजेश पवार 
भंडारा - अरविंद भालाधरे
मानखुर्द शिवाजीनगर - गौतम सोनवणे 

या उमेदवारांची नावे अधिकृतरित्या आज 3 ऑक्टोबर 2019 रोजी  रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी जाहीर केले आहेत. रिपाइंचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मात्र, त्यांचा स्वतंत्र गट असणार आहे. 
 

Web Title: Ramdas athavale announces names of six candidates from RPI in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.