आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:58 IST2025-07-24T12:57:17+5:302025-07-24T12:58:46+5:30

Ganpati Visarjan 2025: गेल्यावर्षी राज्यात घरगुती गणेशमूर्तींची संख्या १६ लाख एवढी होती, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची न्यायालयाला ही माहिती दिली...

Now it will be mandatory to immerse six-foot Ganesh idols in artificial lakes instead of five High Court directs the state government | आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश

आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश

Ganpati Visarjan 2025: राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी गणेश मूर्ती तयार होताना दिसत आहेत. यातच गणेश विसर्जन हाही एक महत्वाचा विषय असतो. यासाठी अनेक ठिकाणी कृत्रीम तलाव तयार करण्यात येत असतात. यातच आता पाच ऐवजी सहा फूटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक असेल. यासंदर्भात उच्च न्यायालयानेराज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आता पाच ऐवजी सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारच्या धोरणात पाच फूटपर्यंतच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याची तरतूद होती. मात्र आता, न्यायालयाने धोरणात बदल करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, हाच आदेश नवरात्रौत्सव, माघी गणेशासाठीही लागू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे दिले आहेत. हा आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू असेल.

यावर्षी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील १, १०,००० गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित होणार - 
या वर्षी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील तब्बल १, १०,००० गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित होतील, असा अंदाज राज्य सरकार आणि महापालिकेने वर्तवला आहे. गेल्यावर्षी राज्यात घरगुती गणेशमूर्तींची संख्या १६ लाख एवढी होती, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची न्यायालयाला ही माहिती दिली.
 

Web Title: Now it will be mandatory to immerse six-foot Ganesh idols in artificial lakes instead of five High Court directs the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.