२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 09:59 IST2025-12-31T09:59:00+5:302025-12-31T09:59:23+5:30
भाजप-शिंदेसेना बहुतेक ठिकाणी एकत्र लढणार असे कालपर्यंतचे चित्र असतानाच अनेक ठिकाणी या युतीला मंगळवारी तडे गेले. काँग्रेसची वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी झाल्याचे दिसत असून अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हातमिळवणी केली आहे.

२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
मुंबई: राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष हे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कुठे एकमेकांसोबत आहेत, तर कुठे विरोधात. त्यांचे नेते दुपारच्या सभेत ज्या पक्षांवर टीका करतील त्याच पक्षांचे कौतुक त्यांना संध्याकाळच्या दुसर्या शहरातील सभेत करावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजप-शिंदेसेना बहुतेक ठिकाणी एकत्र लढणार असे कालपर्यंतचे चित्र असतानाच अनेक ठिकाणी या युतीला मंगळवारी तडे गेले. काँग्रेसची वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी झाल्याचे दिसत असून अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हातमिळवणी केली आहे.
नागपुरात स्वबळावर लढत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अकोल्यात भाजपशी युती केली आहे. महापालिकागणिक मित्र आणि विरोधकांची इतकी अभूतपूर्व अदलाबदल यापूर्वी कोणत्याही महापालिका निवडणुकीत झालेली नव्हती. मुंबई, ठाणे, नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या हातात हात घालून मते मागताना दिसतील तर बहुतेक महापालिकांमध्ये एकमेकांवर त्यांना टीका करावी लागणार आहे. मुंबईत उद्धव सेनेच्या विरोधात लढत असलेल्या काँग्रेसने पुण्यात त्यांच्याशी आघाडी केली आहे.
मुंबई : १. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युती २. उद्धवसेना + मनसे राष्ट्रवादी (शरद पवार) ३. भाजप-शिंदेसेना
नवी मुंबई : १. भाजप (स्वबळ), २. शिंदेसेना (स्वबळ), ३. उद्धवेसना-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आघाडी, ४. राष्ट्रवादी अजित पवार (स्वबळ), ५. रिपाइं (स्वबळ)
पनवेल : १. भाजप, शिंदेसेना, आरपीआय (आठवले) राष्ट्रवादी अजित पवार युती, २. शेकाप, काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, मनसे, सपा आघाडी, ३. एमआयएम (स्वबळ)
पुणे : १. भाजप, रिपाइं युती २. राष्ट्रवादी अजित पवार-राष्ट्रवादी शरद पवार एकत्र ३. काँग्रेस, उद्धवसेना, मनसे आघाडी ४. शिंदेसेना (स्वबळ)
पिंपरी-चिंचवड : १. भाजप रिपाइंची युती. २. राष्ट्रवादी (अजित पवार) + राष्ट्रवादी (शरद पवार) यांची आघाडी. ३. उद्धवसेना मनसे+रासपची आघाडी. ४. शिंदेसेना (स्वबळ), ५. काँग्रेस (स्वबळ), ६. वंचित (स्वबळ)
सांगली, मिरज, कुपवाड : १. भाजप-जनसुराज्य-रिपाइं (आठवले गट) युती, २. काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार यांची आघाडी २. उद्धवसेना-मनसे-राष्ट्र विकास आघाडी यांची आघाडी ३. शिंदेसेना (स्वबळ), ४. राष्ट्रवादी अजित पवार (स्वबळ)
इचलकरंजी : १. भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी अजित पवार यांची महायुती (राष्ट्रवादी अजित पवार काही जागा मैत्रीपूर्ण नावाखाली स्वबळावर लढणार) २. काँग्रेस-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार-स्वाभिमानी शेतकरी संघटना- कम्युनिस्ट पक्ष यांची शिव शाहू आघाडी ३. उद्धवेसना (स्वबळ), ४. वंचित (स्वबळ)
कोल्हापूर : १. भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) युती, २. काँग्रेस-उद्धवसेना यांची युती, ३. राष्ट्रवादी (शरद पवार)- वंचित आणि आप यांची युती, ४. जनसुराज्य-आरपीआय युती
सोलापूर : १. भाजप (स्वबळ), २. शिंदेसेना राष्ट्रवादी (अजित पवार) युती, ३. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना, माकप महाआघाडी. ४. एमआयएम (स्वबळ), ५. रिपाइं (स्वबळ)
नागपूर : १. भाजप-शिंदेसेना यांची युती २. काँग्रेस- (स्वबळ), ३. बसपा (स्वबळ), ४. उद्धवेसना - (स्वबळ), ५. राष्ट्रवादी (शरद पवार) (स्वबळ), ६. राष्ट्रवादी (अजित पवार) - (स्वबळ), ७. मनसे (स्वबळ)
चंद्रपूर : १. भाजप-शिंदेसेना यांची युती २. काँग्रेस- (स्वबळ), ३. उद्धवेसना-वंचित युती ४. राष्ट्रवादी (शरद पवार) (स्वबळ), ५. राष्ट्रवादी (अजित पवार) - (स्वबळ)
अकोला : १. भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती, २. उद्धवसेना-मनसे-प्रहार यांची आघाडी, ३. शिंदेसेना (स्वबळ), (८० पैकी ७३ जागा) ४. काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार) यांची आघाडी (काही ठिकाणी उद्धवसेनेला पाठिंबा)
अमरावती : १. भाजप (स्वबळ), शिंदेसेना (स्वबळ), २. उद्धवेसेना-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार यांची आघाडी, ३. राष्ट्रवादी अजित पवार (स्वबळ), ४. काँग्रेस (१२ ठिकाणी उद्धवसेनेसोबत, इतर ठिकाणी स्वबळ), ५. वंचित बहुजन आघाडी, युनायटेड फोरम यांच्यात आघाडी
जळगाव : १. भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची महायुती, २. उद्धवेसना-राष्ट्रवादी शरद पवार यांची आघाडी, ३. काँग्रेस वंचित यांची आघाडी
अहिल्यानगर : १. भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती, २. उद्धवेसना-राष्ट्रवादी (शरद पवार), काँगेस यांची आघाडी, ३. मनसे (स्वबळ), ४. शिंदेसेना (स्वबळ)
धुळे : १. भाजप (स्वबळ), २. शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती पण काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, ३. काँग्रेस-उद्धवेसना-राष्ट्रवादी शरद पवार - मनसे यांची आघाडी, ४. वंचित (स्वबळ), ५. एमआयएम (स्वबळ), ६. बसप
नाशिक : १. भाजप (स्वबळ), २. शिंदेसेना- राष्ट्रवादी (अजित पवार) याची युती, ३. उद्धवेसना-मनसे-(राष्ट्रवादी शरद पवार), काँग्रेस यांची आघाडी, ४. माकप (स्वबळ)
मालेगाव : १. भाजप (स्वबळ), २. शिंदेसेना (स्वबळ), ३. उद्धवसेना व मनसे युती, ४. राष्ट्रवादी अजित पवार (स्वबळ), ५. काँग्रेस (स्वबळ), ६. एमआयएम (स्वबळ), ७. समाजवादी, इस्लाम (स्थानिक पार्टी) व वंचित बहुजन आघाडीत युती.
जालना : १. राष्ट्रवादी (अजित पवार) मनसेची युती, २. मविआतील मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना एकत्र, ३. भाजप (स्वबळ), ४. शिंदेसेना (स्वबळ), ५. वंचित (स्वबळ),
नांदेड-वाघाळा : १. भाजप (स्वबळ), २. शिंदेसेना (स्वबळ), ३. राष्ट्रवादी अजित पवार (स्वबळ), ४. उद्धवेसना-मनसे मैत्रीपूर्ण लढणार, ५. राष्ट्रवादी शरद पवार (स्वबळ), ६. काँग्रेस वंचित यांची आघाडी
छत्रपती संभाजीनगर: १. भाजप (स्वबळ), २. शिंदेसेना (स्वबळ), ३. उद्धवसेना (स्वबळ), ४. काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार एकत्र, ५. वंचित (स्वबळ)
लातूर : १. भाजप (स्वबळ), २. शिंदेसेना (स्वबळ), ३. राष्ट्रवादी अजित पवार (स्वबळ), ४. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी, ५. राष्ट्रवादी शरद पवार (स्वबळ), ६. उद्धवसेना (स्वबळ)