"पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात..."; 'लाडकी बहीण' योजनेवरून मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:37 IST2025-03-10T13:36:58+5:302025-03-10T13:37:40+5:30
"... पण, आता अशी एकही बहिण नसेल की, तिला घर नाही किंवा गाडी नाही म्हणून."

"पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात..."; 'लाडकी बहीण' योजनेवरून मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा!
काय असते की, सरकार शेतकरी विरोधी आहे की नाही, हे शतकऱ्यांनी पाच वर्षांतच बघायला हवे. खरंच, गोरगरिबांनी एवढे भळभळायला नको आणि पलट्या मारून यांना नीट करायला हवे. आता त्या लाडक्या बहिणींचे नाही का, आधी सरसकट पैसे दिले आणि आता एकाएकीच म्हणताय अटी लावायच्या. तुझ्याकडे घर नाही पाहिजे, फोर व्हीलर नाही पाहिजे, आणखी काही बरंच आहे वाटतं. मला काही जास्त अटी माहीत नाहीत. पण, आता अशी एकही बहिण नसेल की, तिला घर नाही किंवा गाडी नाही म्हणून... आणि आधी नाही का जमलं? आधी बघायचे ना? आधी सरसकट वाढवून टाकले, आता मोकळे झाले. पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात. की हे वेळेवर किती फसवणूक करतात. जे करतंय ते चांगल्यासाठीच करतेय सरकार, लोकं हुशार व्हायला लागलेत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, "हे मागणी केल्याने काही काम करतात का? जेथे त्यांचे हीत आहे, ते तिकडे बजेट टाकणार. कॉन्ट्रॅक्टरला टाकणार, कंपन्यांना टाकणार, त्यांच्या मित्रांना टाकणार. इकडे गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही करणार. संपूर्ण बिल माफी नाही करणार, आरक्षण हवे आहे, तेही नाही देणार. त्यांच्या हिशेबानेच अर्थसंकल्प असतो तो."
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आपली काही कर्जमाफीची मागणी आहे का? असे विचारले असता जरांगे म्हणाले, "असायला काय? मला काय कडू लागते का? पण देणार नाहीत ना हो. हे देणारच नाहीत. शेतकरी किती दिवसापासून संकटात आहेत? त्यांचे पीक विमे येत नाहीत. त्यांची नुकसान भरपाई येत नाही आणखी. त्यांचा हक्क त्यांना मिळत नाही, मालाला भाव वाढत नाही. हे सर्व शेतकऱ्यांना बघावेच लागणार आहे."