Maharashtra Election 2019 : Dhiraj Deshmukh sick, hospitalized after suffering grief in election rally | Maharashtra Election 2019 : दु:खणं अंगावर काढल्यानं धीरज देशमुख आजारी, रुग्णालयात दाखल
Maharashtra Election 2019 : दु:खणं अंगावर काढल्यानं धीरज देशमुख आजारी, रुग्णालयात दाखल

विधानसभेची लढाई अंतिम टप्प्यात आली असून आता प्रचारातील रंगत वाढली आहे. उमेदवारांनी मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठींवर भर देण्यास सुरुवात केली आहे. लातूरमध्ये एकाच कुटुंबातील दोघं सख्खे भाऊ अर्थात अमित देशमुख आणि धीरज देशमुख विधानसभेच्या रिंगणात असून या दोघांना आमदार करण्यासाठी संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. मात्र, विधानसभेच्या रणधुमाळीत फिरताना धीरज देशमुख आजारी पडले आहेत. 

धीरज देशमुख यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये मी आजारी असल्याचे धीरज यांनी सांगितले. धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. धीरज यांच्या प्रचारासाठी अख्ख देशमुख कुटुंब प्रचाराला लागलं आहे. सेलिब्रिटी असलेल्या जेनलिया आणि रितेश या जोडीनेही पायाला भिंगरी लावून प्रचारात उडी घेतली आहे. 

धीरज देशमुख यांची फेसबुक पोस्ट 

कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसते. मागील दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता, पण प्रचार सभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झाले. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच दवाखान्यात अॅडमीट व्हावे लागले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापीच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढले आहे. सध्या मी उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करावी असे कांहीं नाही.
माझे जिवाभावाचे कार्यकर्ते, हितचिंतक व आपण सर्वजण माझ्यासाठी प्रचार करत आहात. या दरम्यान आपणही तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या शुभेच्छा आणि स्नेहाच्या बळावर मी लवकरच बरा होवून आपणासोबत प्रचारात सहभागी होईन हा विश्वास मला आहे. माझ्या अनुपस्थितीत आपण प्रचाराचे कार्य जोमात सुरू ठेवल्याबद्दल मी आपले शतश: आभार व्यक्त करू इच्छितो.
"तुम्ही आहात, म्हणून मी आहे"
लवकरच भेटू !
- आपला धिरज

 

Web Title: Maharashtra Election 2019 : Dhiraj Deshmukh sick, hospitalized after suffering grief in election rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.