गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 04:32 PM2019-10-17T16:32:00+5:302019-10-17T16:47:31+5:30

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे नाराज असून, ते गोर्डे यांच्या प्रचारापासून लांब असल्याचे दिसत आहे.

maharashtra assembly election 2019 Paithan Assembly Constituency Report | गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ?

गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ?

googlenewsNext

मुंबई - राजकरणात कधी काय होईल यांचा अंदाज नसतो. असेच काही पैठण विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. कधीकाळी कट्टर शिवसैनिक असलेले आणि त्यांनतर भाजपमध्ये गेलेले दत्ता गोर्डे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवत, राजकीय गुरूलाच आव्हान देत मैदानात उतरले आहे. त्यामुळे पैठण मतदारसंघातील लढत चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्यावेळी आमदार भुमरे पैठणमधून चौथ्यांदा ( २००९ सोडून ) आमदार म्हणून निवडून आले. मात्र भुमरेंच्या राजकीय तालमीतील मल्ल समजले जाणारे दत्ता गोर्डेचं आता त्यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहे. गोर्डे हे भाजपमध्ये असताना सुद्धा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडली नव्हती. तर भुमरेंच्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारचं अशी भूमिका गोर्डे यांनी यावेळी घेतली होती.

त्यामुळे ऐनवेळी गोर्डे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवत, भूमरेंच्या विरोधात दंड थोपटले. तर या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघात सभा व बैठकीचा धडाकाच लावला असून, संदीपान भुमरे व दत्ता गोर्डे यांच्यातचं खरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुरु-शिष्याच्या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे नाराज असून, ते गोर्डे यांच्या प्रचारापासून लांब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर शिवसेनेचे भुमरेंसाठी भाजपचे नेते प्रचारात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे काँग्रेसचे नेते सुद्धा गोर्डेंचा प्रचार करतांना दिसत आहे. त्यामुळे पैठणमध्ये शिवसेना पुन्हा गड राखणार की परिवर्तन होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जातीय समीकरणे ठरणार महत्वाचे

वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण रिंगणात असून, दलित समाजातील मतदार बरोबरच बंजारा समाजातील मते त्यांच्या बाजूने पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सहाजिकच याचा फटका भुमरे यांना बसू शकतो. तर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहणारा मुस्लीम समाज एमआयएमसोबत जाण्याची शक्यता असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी पैठण विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत जातीय समीकरणे महत्वाचे ठरणार असल्याचे पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

 

Web Title: maharashtra assembly election 2019 Paithan Assembly Constituency Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.