देवदर्शनाला जाताना माजी आमदार दिलीप माने यांच्या गाडीला अपघात
By Appasaheb.patil | Updated: January 14, 2020 15:28 IST2020-01-14T14:51:52+5:302020-01-14T15:28:34+5:30
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ झाला अपघात; अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार, दिलीप माने जखमी

देवदर्शनाला जाताना माजी आमदार दिलीप माने यांच्या गाडीला अपघात
सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांच्या गाडीचा माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे अपघात झाला आहे़ या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात दिलीप माने हे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, माजी आमदार दिलीप माने हे देवदर्शनासाठी म्हसवडकडे निघाले होते़ म्हसवडकडे जात असताना माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ समोरून येणाºया दुचाकीस्वार व कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार शहाजी राऊत (वय ५५) हे जागीच ठार झाले असून दिलीप माने हे जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर दुचाकी व कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच माळशिरस पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक थोड्या वेळासाठी खोळंबली होती.