Due to the cooperation of Shiv Sena in Tuljapur, Ranajagjit Singh's chances increase | तुळजापुरात राणापाटलांना विजयी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार
तुळजापुरात राणापाटलांना विजयी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार

तुळजापूर - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वारंवार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर विधानसभेवर भगवा झेंडा फडकवणे हे आपलं स्वप्न असल्याचे सांगत असत. बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्ही तमाम शिवसैनिक  जीवाचे राण करून राणा पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा निर्धार आज तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी केला.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद येथे राणा जगजीतसिंह पाटील यांना तुळजापूर मतदारसंघातून देखील पराभूत करणार असल्याचे वक्तव्य केल्याने शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान शिवसैनिकांच्या भूमिकेमुळे भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह यांचे पारडे जड झाले आहे. आज झालेल्या बैठकीत शिवसैनिकांनी आम्ही उद्धव साहेबांच्या आदेशानुसार युती धर्म पालन करणार असल्याचे सांगितले. तसेच कोणाच्याही दबावाला बळी न पडता सर्व शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी महायुतीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना सांगताना बाळासाहेब ठाकरेंचे तुळजापूरवर  भगवा फडकवण्याचे स्वप्न साकार करणार असल्याचे नमूद केले.

 

Web Title: Due to the cooperation of Shiv Sena in Tuljapur, Ranajagjit Singh's chances increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.