गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 05:15 PM2020-08-23T17:15:15+5:302020-08-23T17:17:15+5:30

रविवारी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली केले.

Chief Minister inspects the mobile artificial lake of the municipality for immersion of Ganesha | गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

Next
ठळक मुद्देप्रदूषण टाळण्यासाठी गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली तयार करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात आज (23 ऑगस्ट) दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. तसेच, प्रदूषण टाळण्यासाठी गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. 

रविवारी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली केले. यावेळी, अशा पद्धतीने फिरत्या स्वरूपातील या कृत्रिम तलावामुळे गर्दी न होता नागरिकांना त्यांच्याकडील गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येईल व एरव्ही गिरगाव चौपाटी किंवा इतरत्र जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे  यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याचबरोबर, फिरत्या स्वरूपातील विसर्जन तलाव ही कल्पक संकल्पना असून यामुळे सणही उत्साहाने पण नियम पाळून साजरा करणे शक्य होणार आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींचे हे थेट समुद्रात करता येणार नाही. तसेच पालिकेकडून जागोजागी मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडून गणेश विसर्जनसाठी नियमावली
- घरगुती गणेशोत्‍सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.
- मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.
- नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.
- नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या 24 विभागांमध्‍ये सुमारे 170 कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर जाण्‍यास मनाई असल्‍याने सदर कृत्रिम तलावाचा वापर लगतच्‍या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.
 

Web Title: Chief Minister inspects the mobile artificial lake of the municipality for immersion of Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.