Budget 2023: तीन नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा, ४० हजार बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर

By नजीर शेख | Published: February 2, 2024 12:21 PM2024-02-02T12:21:59+5:302024-02-02T12:23:00+5:30

Budget 2023: चाळीस हजार सामान्य रेल्वे बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर करण्यासह पायाभूत सुविधांशी संबंधित तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची  घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली.

Budget 2023: Three new rail corridors announced, conversion of 40,000 coaches to Vande Bharat standards | Budget 2023: तीन नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा, ४० हजार बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर

Budget 2023: तीन नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा, ४० हजार बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर

- नजीर शेख
छत्रपती संभाजीनगर - चाळीस हजार सामान्य रेल्वे बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर करण्यासह पायाभूत सुविधांशी संबंधित तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची  घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली. मालवाहतुकीसाठी बांधण्यात येत असलेल्या रेल्वे कॉरिडॉरशिवाय ऊर्जा, खनिज व सिमेंट कॉरिडॉर, पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि उच्च रहदारी घनता कॉरिडॉरची घोषणा केली.

ऊर्जा आणि सिमेंट कॉरिडॉरचा वापर सिमेंट आणि कोळसा वाहतूक करण्यासाठी स्वतंत्रपणे केला जाईल. पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर हा देशातील प्रमुख बंदरे जोडेल. तर उच्च रहदारी घनता कॉरिडॉर हा जास्त गर्दी असलेल्या रेल्वे मार्गांसाठी असेल. उच्च-वाहतूक कॉरिडॉरमधील गर्दी कमी केल्याने केवळ प्रवासी गाड्यांचे संचालनच वाढणार नाही तर सुरक्षितता सुनिश्चित होईल आणि प्रवासाचा वेग वाढेल. पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारण्यासही मदत होईल. हे तीन आर्थिक कॉरिडॉर सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी)  वाढीला गती देतील तसेच दळणवळणावरील खर्च कमी करतील. पीएम गती शक्ती उपक्रमांतर्गत ओळखल्या गेलेल्या या प्रकल्पांचा उद्देश मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी वाढवणे हा आहे. तसेच समर्पित मालवाहतूक (डेडिकेटेड फ्रेट)  कॉरिडॉरमुळे विकासदर वाढण्यासाठी मदत होऊ शकेल. या स्वतंत्र मार्गिकांमुळे मालवाहतूक सुलभ होऊ शकेल. तसेच प्रवासी वाहतुकीलाही याचा फायदा होऊ शकेल, असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला. 

मेट्रो, नमो भारत
मेट्रो आणि नमो भारत या सेवांचा विस्तार केला जाणार आहे. बड्या शहरांमध्ये मेट्रो आणि नमो भारत सेवा पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. मेट्रो रेल्वे, नमो भारत आवश्यक शहरी परिवर्तनासाठी उत्प्रेरक ठरू शकतात. 

बाजारातही गती
अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या समभागांनी सकारात्मक गती दाखवली. इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेडचे शेअर्स ३.२६ % वाढले, टेक्समॅको रेल ॲण्ड इंजिनीअरिंगने २.७१ % ची उडी घेतली. 

रेल्वेची गती-शक्ती वाढणार
आज संसदेत सादर झालेले अंतरिम बजेट सर्व वर्गातील, सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे आहे. ४० हजार नवीन वंदे भारत कोच तयार होणार आहेत. रेल्वे एनर्जी, मिनरल आणि सिमेंट कॉरिडॉर तयार करून वाहतुकीला चालना दिली जाणार आहे. रेल्वे हाय डेन्सिटी ट्रॅफिक कॉरिडॉर बनणार आहे. रेल सागर अंतर्गत पोर्टची वाहतूक वाढविण्यासाठी रेल्वेची क्षमता वाढविली जाणार आहे. २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार असून, त्यादृष्टीने नवीन इन्फ्रा स्टक्चर उभे करण्यासाठी देशाला दिशा देणारा अर्थसंकल्प सादर 
झाला आहे.
- रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री 

पॅसेंजर रेल्वेंची खरी गरज
- अरुण मेघराज

अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ
४० हजार सामान्य बोगी वंदे भारत एक्स्प्रेस दर्जाच्या होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ही श्रीमंतांसाठीच सोय केली जाते, असे वाटतेय. त्यातून तिकीट दर वाढतील. खरे तर प्रवाशांच्या सुविधेसाठी पॅसेंजर रेल्वेंची आवश्यकता आहे. सध्या हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील नियमित अर्थसंकल्पात सामान्य प्रवाशांच्या दृष्टीने सुविधांची अपेक्षा करता येईल. मात्र, तीन कॉरिडॉरची घोषणा ही नवीन असून रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी ती आवश्यक आहे. अशा प्रकारच्या कॉरिडॉरमुळे मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक अधिक सुलभतेने होण्यास मदत होईल.

महाराष्ट्रात रेल्वेला काय मिळाले?
नवीन रेल्वे मार्गिका
nनगर-बीड-परळी रेल्वेमार्ग : २७५ कोटी
nबारामती-लोणंद रेल्वे : 
३३ कोटी
nवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे : ७५० कोटी
nसोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर रेल्वेलाइन : 
२२५ कोटी
nधुळे-नार्धना रेल्वे लाइन : ३५० कोटी
nकल्याण-मुरबाड-उल्हासनगर रेल्वे लाइन : १० कोटी

दुसरी, तिसरी, चौथी मार्गिका प्रकल्प
nकल्याण-कसारा तिसरी मार्गिका : ८५ कोटी
nवर्धा-नागपूर रेल्वे तिसरी मार्गिका : १२५ कोटी
nवर्धा-बल्लार शाहा तिसरी मार्गिका : २०० कोटी
nइटारसी-नागपूर तिसरी मार्गिका : ३२० कोटी
nपुणे-मिरज रेल्वे दुसरी मार्गिका : २०० कोटी
nदौंड-मनमाड दुसरी मार्गिका : ३०० कोटी
nवर्धा-नागपूर चौथी लाईन :१२० कोटी
nमनमाड-जळगाव तिसरी : १२० कोटी
nजळगाव-भुसावळ चौथी मार्गिका : ४० कोटी
nभुसावळ-वर्धा तिसरी मार्गिका : १०० कोटी
गेज रूपांतर
nपाचोरा जामनेर लाइनसाठी : ३०० कोटी,
यार्ड रिमोल्डिंग
nकसारा : १ कोटी
nकर्जत : १० कोटी
nपुणे : २५ कोटी
मुंबईसाठी काय?    
nसीएसएमटीसाठी प्लॅटफॉर्म लांबीकरण : १० कोटी 
nलोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन : २ कोटी

Web Title: Budget 2023: Three new rail corridors announced, conversion of 40,000 coaches to Vande Bharat standards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.