लातूर मनपा निवडणूक: दोन दिवसांत तब्बल ५१३ अर्जांची विक्री, एकही दाखल नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 20:03 IST2025-12-25T20:02:39+5:302025-12-25T20:03:02+5:30
अद्याप एकाही उमेदवाराने आपला अर्ज प्रत्यक्ष दाखल केलेला नाही.

लातूर मनपा निवडणूक: दोन दिवसांत तब्बल ५१३ अर्जांची विक्री, एकही दाखल नाही
लातूर : शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी उमेदवारी अर्ज घेण्याच्या दुसऱ्या दिवशी इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. २४ डिसेंबर रोजी शहरातील विविध प्रभागांमधून एकूण ३६९ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. विशेष म्हणजे, प्रभाग १३, १४ आणि १५ समाविष्ट असलेल्या भागात सर्वाधिक ९८ अर्ज नेले असून, अद्याप एकाही उमेदवाराने आपला अर्ज प्रत्यक्ष दाखल केलेला नाही.
निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी १४४ अर्ज विकले गेले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी ३६९ अर्जांसह आतापर्यंत एकूण ५१३ अर्जांची विक्री झाली आहे. राजकीय पक्षांकडून एबी फॉर्म मिळण्याची प्रतीक्षा आणि कागदपत्रांची जुळवाजुळव यामुळे उमेदवारांनी अर्ज नेण्यावर भर दिला असला, तरी 'अर्ज दाखल' करण्याबाबत अद्याप शांतता आहे.
प्रभागनिहाय अर्ज विक्रीचा तपशील
प्रभाग क्रमांक अर्ज विक्री संख्या दाखल अर्ज
प्रभाग क्र. १, २, ३ ७० निरंक
| प्रभाग क्र. ४, ५, ६ ४१ निरंक
| प्रभाग क्र. ७, ८, ९ ३९ |निरंक
| प्रभाग क्र. १०, ११, १२ | ५६ | निरंक
| प्रभाग क्र. १३, १४, १५ | ९८ | निरंक |
| प्रभाग क्र. १६, १७, १८ | ६५ | निरंक |
| एकूण | ३६९| निरंक |
प्रभाग १३ ते १५ मध्ये उमेदवारांची मोठी गर्दी
क्षेत्रीय कार्यालय ''अ'' अंतर्गत येणाऱ्या प्रभाग १३ ते १५ मध्ये उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे अर्जांच्या संख्येवरून दिसून येते. त्यापाठोपाठ प्रभाग १, २ आणि ३ मध्ये ७० अर्जांची विक्री झाली आहे. सर्वात कमी प्रतिसाद प्रभाग १६ ते १८ मध्ये दिसून आला. येत्या काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येऊन प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे.