लातुरात परस्परविरोधी गुन्हे दाखल; काँग्रेस, भाजप उमेदवारांत आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:16 IST2026-01-13T12:14:37+5:302026-01-13T12:16:01+5:30
मतदारांची नावे असलेली चिठ्ठी आणि पैसे व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

लातुरात परस्परविरोधी गुन्हे दाखल; काँग्रेस, भाजप उमेदवारांत आरोप-प्रत्यारोप
लातूर : रविवारी भाजपकडून मारहाणीसंदर्भात तक्रार, तर काँग्रेसकडून मतदानासाठी पैशांचे आमिष दाखविल्याची फिर्याद देण्यात आली. यासंदर्भात पहिल्यांदा मारहाणप्रकरणी काँग्रेस उमेदवारावर रविवारी गुन्ह्याची नोंद झाली होती. दरम्यान, मतदानासाठी आमिष दाखविल्याप्रकरणी भाजप उमेदवारासह तिघांवर सोमवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.
माताजीनगर येथील महेंद्र प्रदीप हांडे (वय ३५, व्यवसाय शेती) यांनी तक्रारीत म्हटले आहे, प्रभाग १८मध्ये भाजप उमेदवार अदिती पाटील यांना मतदान करण्यासाठी प्रलोभन दाखविण्यात आले. त्यास नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून संजय गीर, अजित पाटील, आदिती अजित पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या दिवशीही तक्रार
सोमवारीही एका कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना पकडल्याचा दावा प्रभाग ११ मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मतदारांची नावे असलेली चिठ्ठी आणि पैसे व्हिडीओमध्ये दिसत आहेत. परंतु ज्याच्यावर आरोप केला, ती व्यक्ती व्हिडीओमध्ये ते पैसे माझे व्यक्तिगत आहेत. मी कोणाला पैसे वाटण्यासाठी जात नव्हतो, असे सांगत आहे.