लातूरात भाजपसमोर बंडोबांचे आव्हान; पक्षादेश झुगारून रिंगणात, उमेदवारांची धाकधूक वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:51 IST2026-01-03T17:49:32+5:302026-01-03T17:51:27+5:30

पक्षादेश झुगारून रिंगणात उतरलेल्यामुळे अनेकांची अडचण होणार

BJP faces challenge of riots in Latur; Defying party orders, candidates enter the fray, fear increases! | लातूरात भाजपसमोर बंडोबांचे आव्हान; पक्षादेश झुगारून रिंगणात, उमेदवारांची धाकधूक वाढली!

लातूरात भाजपसमोर बंडोबांचे आव्हान; पक्षादेश झुगारून रिंगणात, उमेदवारांची धाकधूक वाढली!

लातूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाजपमध्ये मोठी बंडाळी पाहायला मिळत आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अपक्ष अर्ज कायम ठेवले असून, यामुळे पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण झाला आहे.

लातूर मनपासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. शुक्रवारी, २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. पक्ष नेतृत्वाने नाराजांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अनेक प्रभागांत इच्छुकांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पक्षादेश झुगारून रिंगणात उतरलेल्या या बंडखोरांमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. बंडखोरीमुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा विरोधी पक्षांना मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.

राजकीय वर्तुळातील चर्चा..!
बंडखोरांची मनधरणी करण्यात वरिष्ठ नेत्यांना अपेक्षित यश आलेले नाही. आता ही बंडखोरी शमवण्यासाठी पक्ष आगामी काळात कोणती ठोस भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनीच अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. वर्षानुवर्षे पक्षाचे काम करूनही डावलले गेल्याची भावना या इच्छुकांनी व्यक्त केली आहे. याअंतर्गत कलहामुळे अधिकृत उमेदवारांना आता केवळ विरोधकांशीच नव्हे, तर आपल्याच पक्षातील नाराजांशीही लढावे लागणार आहे. दरम्यान, आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, या बंडखोरीचा फटका नेमका कोणाला बसतो आणि पक्ष यावर कशी मात करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title : लातूर में भाजपा के सामने विद्रोह की चुनौती; निर्दलीय बढ़ा रहे उम्मीदवारों की चिंता

Web Summary : लातूर भाजपा को आंतरिक विद्रोह का सामना करना पड़ रहा है क्योंकि टिकट से वंचित कई निर्दलीय बने हुए हैं। यह विभाजन आधिकारिक उम्मीदवारों के लिए खतरा है, जिससे संभावित रूप से विपक्ष को लाभ हो सकता है। वरिष्ठ नेता असंतोष को शांत करने के लिए संघर्ष कर रहे हैं, जिससे पार्टी की भविष्य की रणनीति और चुनाव परिणामों पर प्रभाव के बारे में चिंता बढ़ रही है।

Web Title : Rebellion Challenges BJP in Latur; Independents Increase Candidate Worries

Web Summary : Latur BJP faces internal rebellion as many denied tickets remain independent. This division threatens official candidates, potentially benefiting opposition. Senior leaders are struggling to quell dissent, raising concerns about the party's future strategy and the impact on election results.